'मैं मर जाऊ यहीं पे..' लाइव्ह कॉन्सर्टमध्ये KK च्या तोंडातून निघालेले ते शब्द अखेर ठरले खरे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:18 IST2022-06-01T16:18:06+5:302022-06-01T16:18:56+5:30
Krishnakumar Kunnath Died: या शो दरम्यान त्यांनी सहजच उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं आणि त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांचे अखेरचे ते शब्द सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असून प्रत्येकाचं मन हेलावून जात आहे.

'मैं मर जाऊ यहीं पे..' लाइव्ह कॉन्सर्टमध्ये KK च्या तोंडातून निघालेले ते शब्द अखेर ठरले खरे!
नशिबात कधी काय घडेल याचा काही नेम नसतो, असं अनेकदा म्हटलं जातं. असंच काहीसं प्रसिद्ध गायक KK यांच्यासोबत घडलं. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. KK यांच्या निधनामुळे सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर त्यांच्या शेवटच्या ठरलेल्या लाइव्ह कॉनर्स्टदेखील चर्चेत येत आहे.
कोलकात्ता येथे लाइव्ह कॉनर्स्ट सुरु असताना केके यांची प्राणज्योती मालवली. विशेष म्हणजे या शो दरम्यान, त्यांनी सहजच उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं आणि त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांचे अखेरचे ते शब्द सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असून प्रत्येकाचं मन हेलावून जात आहे.
Net worth: साधी राहणी असलेले KK होते कोटयवधींचे मालक; लाइव्ह कॉन्सर्टसाठी घ्यायचे लाखोंचं मानधन
काय होते KK यांचे अखेरचे शब्द?
३१ तारखेला कोलकात्तामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉनर्स्टमध्ये KK ओम शांती ओम या चित्रपटातील आखों में तेरी...हे गाणं गात होते. यावेळी गाणं गाता गाता त्यांनी प्रेक्षकांनादेखील या गाण्यात सहभागी करुन घेतलं. त्यामुळे उपस्थित सगळेच जण त्यांच्या सुरात सूर मिसळून गात होते. यात महिलावर्गाकडून मिळत असेलला प्रतिसाद पाहून ते भारावून गेले होते. त्यामुळे "हाय मर जाऊं यहीं पे", असं ते मस्करीमध्ये म्हणाले. पण, मजेत म्हटलेलं हे वाक्य खरं ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
He said “mai mar jaau yahin pe” and the shitty thing happened there. Can’t believe this
— Ankit Tiwari (@officiallyAnkit) June 1, 2022
Om shanti #kk#KKLIVE#kk#KKsinger#RIPKK#RIPKK#RIPLegendpic.twitter.com/PtcGW7IF9A
लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या KK ला वाटायची कॅमेराची भीती; स्वत: केला होता खुलासा
दरम्यान, एकीकडे लाइव्ह कॉनर्स्ट सुरु असताना दुसरीकडे KK यांना त्रास जाणवत होता. आणि पुढच्याच क्षणी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं व त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांचा हा अखेरच्या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अंकित तिवारीने ट्विट केला आहे.