KK Last Song: धूप पानी बहने दे....केकेचं शेवटचं गाणं...! ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:04 IST2022-06-07T17:03:52+5:302022-06-07T17:04:32+5:30
KK Last Song: केकेच्या मृत्यूपश्चात त्याचं शेवटचं गाणं रिलीज झालं आहे. ‘शेरदिल’साठी केलेलं रेकॉर्ड

KK Last Song: धूप पानी बहने दे....केकेचं शेवटचं गाणं...! ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!!
KK Last Song Dhoop Paani Bahne De: बॉलिवूडचा सर्वाचा लाडक गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ (KK Krishnakumar Kunnath) याने अचानक जगातून एक्झिट घेतली. 31 मेच्या रात्री लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. केकेच्या अकाली जाण्याने बॉलिवूडसह संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. तमाम चाहत्यांना मोठा धक्का बसला. अद्यापही चाहते या दु:खातून सावरलेले नाहीत. आता केकेच्या मृत्यूपश्चात (KK Death) त्याचं शेवटचं गाणं रिलीज झालं आहे. केकेच्या आवाजातील हे गाणं ऐकून तुम्हीही भावुक व्हाल.
‘शेरदिल’ या आगामी चित्रपटातील ‘धूप पानी बहने दे’ हे गाणं केकेनं गायलं होतं. गुलजार यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून शांतनु मोइत्रा याने या गाण्याला संगीत दिलं आहे. केकेच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. ‘शेरदिल’ या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका आहे. त्यांच्यावरच ‘धूप पानी बहने दे’ हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. ‘शेरदिल: द पीलीभीत सागा’ हा चित्रपट येत्या 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. केके यांचे शेवटचे गाणे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर केकेचं हे शेवटंच गाणं तुफान व्हायरल होतंय. हे गाणं पाहून केकेचे फॅन्स भावुक झाले आहेत. कोलकात्यात 31 मे रोजी लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केकेला हृदयविकाराच्या झटका आला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.