लग्नानंतर अथिया शेट्टी व केएल राहुल होणार रणबीर-आलियाचे शेजारी? चर्चा तर हीच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 03:32 PM2022-05-01T15:32:44+5:302022-05-01T15:33:30+5:30
KL Rahul and Athiya Shetty : अथिया व केएल लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्याआधी हे कपल लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची चर्चाही कानावर येतेय.
बॉलिवूड आणि क्रिकेटची पुन्हा एकदा जोडी जमणार आहे. आता या यादीत क्रिकेटपटू के. एल. राहुल (KL Rahul ) आणि बॉलिवूड गर्ल अथिया शेट्टी (Athiya Shetty ) यांचं नाव सामील झालं आहे. अथिया व केएल लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्याआधी हे कपल लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची चर्चाही कानावर येतेय. याची तयारी सुरू झालीये. चर्चा खरी मानाल तर लग्नाआधी केएल व अथिया एकत्र राहण्याचा प्लान करत असल्याचं कळतंय. यासाठी कपलने मुंबईच्या पाली हिल भागातील एका अलिशान बिल्डिंगमध्ये एक अलिशान घर खरेदी केलं आहे.
संधू पॅलेस नावाच्या इमारतीत नवव्या माळ्यावर असलेल्या या घरात सध्या रिनोवेशनचं काम सुरू आहे. खास बात म्हणजे, अथिया व केएलच्या या घराच्या दोन बिल्डिंग पुढे आलिया भट व रणबीर कपूरचं वास्तू हे घर आहे. म्हणजेच काय तर येत्या दिवसांत अथिया व केएल दोघं आलिया व रणबीरचे शेजारी बनणार आहेत.
अथियाची आई माना शेट्टी लेकीच्या या घराचं इंटेरिअर करणार आहे. माना या नावाजलेल्या इंटिरिअर डिझाइनर आहेत. लग्नानंतर याच घरात शिफ्ट होण्याचा कपलचा इरादा आहे. याआधी अथिया व केएल यांनी एक अपार्टमेंट भाड्यानं घेतल्याची चर्चा होती. ही चर्चाही खरी आहे. नवीन घर तयार होत नाही, तोपर्यंत कपल भाड्याच्या घरात राहणार आहे. या अपार्टमेंटचं भाडं महिन्याला किमान 10 लाख रुपये आहे. अथिया व केएलच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. दोघंही साऊथ इंडियन स्टाईलने लग्न करणार असल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.
अद्याप अथिया व केएल यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नुकताच के एल राहुलचा वाढदिवस झाला. या दिवसाचं निमित्त साधत अथिया शेट्टीनं के एल राहुलसअओबतचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते. विशेष म्हणजे, तिच्या या फोटोंवर कमेंट करत के. एल. राहुलनं ‘लव्ह यू’ अशी कमेंट करत प्रेमाची जाहिर कबुलीच दिली होती.
त्याआधी अथियाच्या वाढदिवसाला म्हणजेच, गेल्या 5 नोव्हेंबरला के.एल.राहुलने तिला विश करत, तिच्यासोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला होता. हॅपी बर्थ डे माय हार्ट, असं लिहित त्यानं अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यांनतर दोघेही सतत एकेमकांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. आथिया केएलसोबत अनेक सामन्यांसाठी विदेश दौरा करत असते.