Ankita Lokhande Net Worth: कोट्यवधींची मालकीण आहे अभिनेत्री अंकिता लोखंडे, जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 03:15 PM2021-12-19T15:15:55+5:302021-12-19T15:21:38+5:30

Ankita Lokhande Net Worth: अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिचा आज ३७ वा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे अंकिता नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

Know about actress ankita lokhande net worth and movies | Ankita Lokhande Net Worth: कोट्यवधींची मालकीण आहे अभिनेत्री अंकिता लोखंडे, जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती...

Ankita Lokhande Net Worth: कोट्यवधींची मालकीण आहे अभिनेत्री अंकिता लोखंडे, जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती...

googlenewsNext

Ankita Lokhande Net Worth: अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिचा आज ३७ वा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे अंकिता नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय ठरलेल्या 'पवित्ररिश्ता' मालिकेतून नावारुपाला आलेल्या अंकिता लोखंडेच्या लग्नाची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा आहे. अंकिता लोखंडेनं बॉलीवूडमध्ये 'मणिकर्णिका' चित्रपटातून जबरदस्त एण्ट्री केली. अंकितानं टेलिव्हिजन आणि मोठा पडदा अशा दोन्ही ठिकाणी काम केलं आहे. अंकिता लोखंडे हिचा विवाहसोहळा देखील अगदी 'रॉयल' पद्धतीनं पार पडला. तिच्या विवाह सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वापासूनच हिंदीतील सर्व सेलिब्रिटी आवर्जुन उपस्थित होते. यातच आता अंकिता लोखंडेची नेमकी संपत्ती किती याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

अंकिता लोखंडे कोट्यवधींची मालकीण आहे. बॉलीवूड चित्रपटासाठी ती कोट्यवधी रुपयांचं मानधन घेते. रिपोर्टनुसार अंकिता लोखंडे ३ मिलियन डॉलर म्हणजेच २२ कोटी रुपयांची संपत्तीची मालकीण आहे. अंकिता लोखंडनं आजवर अनेक टेलिव्हिजन शोमध्येही सहभाग घेतला आहे. तर सिनेमांमध्येही ती दिसली आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'प्रवित्र रिश्ता' मालिकेसाठी अंकिता १.५ लाख रुपये मानधन घेत होती असं सांगितलं जातं. तर बॉलिवूडमधील आपल्या पहिल्यावहिल्या 'मणिकर्णिका' चित्रपटातील भूमिकेसाठी तिनं २ ते ३ कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं.

अंकिता लोखंडे मुंबईत आपल्या कुटुंबीयांसोबत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहात होती. आता विकी जैनसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ती मुंबईत विकी जैनच्या ८ बीएचके आलिशान अपार्टमेंटमध्ये राहणार आहे. 

अंकिताला आहे महागड्या कारची आवड
अंकिता लोखंडे हिला महागड्या कारची आवड असून रिपोर्टनुसार तिच्याकडे जॅग्वार एक्सजे आणि पोर्श ७१८ सारख्या आलिशान कार आहेत. या दोन्ही कारची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. अंकिता लोखंडेच्या करिअरवर लक्ष द्यायचं झाल्यास तिनं पवित्र रिश्ता, झलक दिखला जा आणि पवित्र रिश्ता-२ मालिकांमध्ये काम केलं आहे. तर बॉलीवूडमध्ये 'मणिकर्णिका' आणि 'बागी-३' चित्रपटात काम केलं आहे.

विकी जैनसोबत केलं लग्न
अंकिता लोखंडेचं नुकतंच तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं आहे. लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नसोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. अंकिता आणि विकीच्या संगीत सोहळ्यात अभिनेत्री कंगना रणौत देखील उपस्थित होती. समोर आलेल्या माहितीनुसार अंकिताचा पती विकी यानं तिला मालदीवमध्ये एक व्हीला गिफ्ट केला असल्याचं सांगितलं जात आहे. ज्याची किंमत ५० कोटींच्या घरात आहे. 

Web Title: Know about actress ankita lokhande net worth and movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.