सासऱ्यांपेक्षा जावई वरचढ! कमाईच्या बाबतीत श्वेता नंदाच्या नवऱ्याने बिग बींनाही टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 13:37 IST2022-01-10T13:36:37+5:302022-01-10T13:37:21+5:30
Amitabh bachchan: 'सात हिंदुस्तानी या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारे बिग बी आज जवळपास 2950 कोटी रुपये संपत्तीचे मालक असल्याचं म्हटलं जातं.

सासऱ्यांपेक्षा जावई वरचढ! कमाईच्या बाबतीत श्वेता नंदाच्या नवऱ्याने बिग बींनाही टाकले मागे
'कुली', 'शोले', 'दोस्ताना', 'सिलसिला' असे कितीतरी हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बी कलाविश्वावर राज्य करत आहेत. आजवर अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळेच आज कलाविश्वातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये त्यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. परंतु, संपत्तीच्या बाबतीत अनेकांवर मात करणाऱ्या बिग बींचा जावई त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचं म्हटलं जातं.
'सात हिंदुस्तानी या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारे बिग बी आज जवळपास 2950 कोटी रुपये संपत्तीचे मालक असल्याचं म्हटलं जातं. परंतु, त्यांच्यापेक्षा त्यांचा जावई म्हणजेच श्वेता बच्चन-नंदा हिचा पती श्रीमंत असल्याचं सांगितलं जातं.
श्वेताने १९९७ मध्ये निखिल नंदा यांच्यासोबत लग्न केलं असून आज श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये निखिल नंदा यांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. निखिल नंदा हे ‘एस्कॉर्टस लिमिटेड’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. २०१३ मध्ये एस्कॉर्टसच्या मॅनेजिंग डिरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारली.
अमिरिकेतील व्हार्टन बिजनेस स्कूलमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करणारे निखिल यांचा समावेश श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केला जातो. सूत्रांच्या माहितीनुसार, निखिल नंदा यांची संपत्ती ३५०० कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, निखिल नंदा यांचा बच्चन कुटुंबासोबतच कपूर कुटुंबासोबतही खास नातं आहे. निखिल नंदा यांची आई रितू कपूर या दिवगंत अभिनेता, निर्माते राज कपूर यांची लेक आहेत. निखिल नंदा आणि श्वेता नंदा हे दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रातमध्ये करिअर करत आहेत. त्यामुळे अनेकदा श्वेता नंदा मुंबईत असल्याचं पाहायला मिळतं. तर, निखिल नंदा हे दिल्लीतच असतात.