70 व 80 चं दशक गाजवणाऱ्या ‘या’ हास्य अभिनेत्याच्या पत्नीला बघितलं का? दिसते इतकी सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:00 AM2021-09-21T08:00:00+5:302021-09-21T08:00:02+5:30
70 व 80 च्या दशकात सिनेमात एक हसरा चेहरा हमखास दिसायचा. विशेषता हिरोच्या मित्राची भुमिका असली की, पडद्यावर हा चेहरा सर्रास झळकायचा...
70 व 80 च्या दशकात सिनेमात एक हसरा चेहरा हमखास दिसायचा. विशेषता हिरोच्या मित्राची भुमिका असली की, पडद्यावर हा चेहरा सर्रास झळकायचा.आम्ही बोलतोय, ते ‘अंग्रेजो के जमाने के जेलर’ अर्थात हास्य अभिनेते असरानी (Asrani) यांच्याबद्दल. त्या काळात असरानी म्हणजे, विनोदाचा हुकुमी एक्का होते. ‘शोले’ या अजरामर चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ची भूमिका प्रचंड गाजली होती. आज याच असरानींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
असरानी यांचे खरं नाव गोवर्धन असरानी आहे. 1967 साली मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. म्हणायला त्यांच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्याच्याच भुमिका आल्यात. पण चला मुरारी हिरो बनने आणि सलाम मेमसाब यांसारख्या चित्रपटात त्यांनी मुख्य नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत. हिंदीसह त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
सुमारे 350 पेक्षा अधिक सिनेमात वेगवेगळ्या भुमिका साकारणाऱ्या असरानींच्या पत्नी या सुद्धा एकेकाळी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. मंजू बन्सल असं त्यांच्या पत्नीचं नाव. आज की ताजा खबर आणि नमक हराम या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान असरानी यांची मंजू बन्सल (Manju Bansal Asrani) यांच्याशी ओळख झाली. मग मैत्री झाली आणि मग प्रेम. दोघांनीही लग्न केलं. मंजू बन्सल यांनी जवळपास दहा पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
दिवानगी, उधार का सिंदूर, कबिल या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या आहेत. तपस्या , चांदी सोना, जान-ए-बहार, जुर्माना, नालायक, सरकारी मेहमान, चोर सिपाही या चित्रपटांमध्ये असरानी व मंजू ही जोडी एकत्र दिसली होती. 1980 साली असरानी यांनी ‘हम नहीं सुधरेंगे’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातही मंजू आणि असरानी या दोघांनी एकत्र काम केलं होतं.