विकी कौशल आणि कतरिना कैफमध्ये या गोष्टीवरून होतात भांडणं, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:37 PM2024-08-30T12:37:02+5:302024-08-30T12:38:13+5:30

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल आहे. विकीने एका मुलाखतीदरम्यान कतरिना कैफ सोबतच्या भांडणाचा खुलासा केला होता.

Know about Vicky Kaushal and Katrina Kaif's fight over this | विकी कौशल आणि कतरिना कैफमध्ये या गोष्टीवरून होतात भांडणं, जाणून घ्या याबद्दल

विकी कौशल आणि कतरिना कैफमध्ये या गोष्टीवरून होतात भांडणं, जाणून घ्या याबद्दल

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. विकी आणि कतरिनाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. एकमेकांवर प्रेम करणारे विकी आणि कतरिना कधी भांडतात का, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. याबाबत विकीने खुलासा केला होता.  

२०२२ मध्ये विकी कौशलकरण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो कॉफी विथ करणमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत पोहोचला होता. यादरम्यान त्याने पत्नी कतरिना कैफसोबतच्या भांडणाचा एक मजेशीर किस्सा शेअर केला. रॅपिड-फायर राऊंड खेळत असताना, विकी कौशलला तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ कोणत्या गोष्टीवरून भांडतात, असे विचारले. त्यावर विकी म्हणाला, "वॉर्डरोबमधील जागेसाठी." अभिनेता पुढे म्हणाला, " पण ते आता कमी होत आहे."

करण जोहर विकीला म्हणाला 'बिचारा'

यावर होस्ट करणने हसत हसत सांगितले की तो विकी कौशलच्या घरी गेला होता आणि त्याच्याकडे वॉर्डरोबसाठी जागा नव्हती. यावर, विकीने खुलासा केला, "त्याच्याकडे दीड खोली आहे आणि माझ्याकडे एक वॉर्डरोब आहे जो लवकरच ड्रॉवर बनू शकेल." नंतर करणने विकीला 'बिचारा' म्हणत सांत्वन केले आणि नंतर कतरिनाची बाजू घेतली की तिला तिच्या वॉर्डरोबसाठी एवढी मोठी जागा लागेल, शेवटी ती एक 'हिरोईन' आहे.

२०२१ मध्ये विकी-कतरिनाने बांधली ​​लग्नगाठ
काही वर्षे डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले होते. तेव्हापासून हे कपल नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. ही जोडी चाहत्यांमध्ये 'विकट' म्हणून प्रसिद्ध आहे.

विकी-कतरिना वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशल शेवटचा 'बॅड न्यूज'मध्ये तृप्ती डिमरी आणि एमी विर्कसोबत दिसला होता. आता तो ६ डिसेंबर रोजी 'छावा' हा पीरियड वॉर ॲक्शन-ड्रामा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. दुसरीकडे, कतरिना कैफ शेवटची 'मेरी ख्रिसमस; आणि 'टायगर ३'मध्ये दिसली होती. तिच्याकडे फरहान अख्तरसोबत 'जी ले जरा'सह काही प्रोजेक्ट्स आहेत.

Web Title: Know about Vicky Kaushal and Katrina Kaif's fight over this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.