पटौदी पॅलेस परत मिळवताना सैफ अली खानच्या आले होते नाकी नऊ, किंमत वाचून व्हाल अवाक्

By अमित इंगोले | Published: October 19, 2020 11:04 AM2020-10-19T11:04:53+5:302020-10-19T11:06:11+5:30

लोक दूरदूरून हा महाल बघण्यासाठी इथे येतात. फार कमी लोकांना हे माहीत असेल की, सैफ अली खानने हा महाल मोठ्या मुश्कीलीने परत मिळवला होता.

Know how Saif Ali Khan bought back his Pataudi palace | पटौदी पॅलेस परत मिळवताना सैफ अली खानच्या आले होते नाकी नऊ, किंमत वाचून व्हाल अवाक्

पटौदी पॅलेस परत मिळवताना सैफ अली खानच्या आले होते नाकी नऊ, किंमत वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान कदाचित एकुलता एक असा अभिनेता असेल ज्याच्याकडे छोटा-मोठा बंगला नाही तर भव्य महाल आहे. पटौदीचा नवाब सैफ अली खान याच्याकडे परिवाराची मोठी संपत्ती आहे. त्याचा पटौदी पॅलेस प्रसिद्ध असून त्याला इब्राहीम कोठी असं म्हटलं जातं. हरयाणातील गुडगांवजवळ हा महाल आहे. लोक दूरदूरून हा महाल बघण्यासाठी इथे येतात. फार कमी लोकांना हे माहीत असेल की, सैफ अली खानने हा महाल मोठ्या मुश्कीलीने परत मिळवला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृ्तानुसार, एका हॉटेल चेनला हा पटौदी महाल भाड्याने दिला गेला होता. सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी यांच्या  निधनानंतर सैफने हा महाल पुन्हा सजवला. एका मुलाखतीत सैफ अली खानने सांगितले की, हा महाल परत मिळवण्यासाठी त्याच्या नाकी नऊ आले होते. सैफने सांगितले की, सिनेमात पैसा कमावून त्याने ही कोठी परत मिळवली होती. (ड्रग्स प्रकरणात नाव येताच सारा अली खानवर नाराज आहे वडील सैफ अली खान ?)

सैफ म्हणाला की, या कोठीसोबत त्याच्या आयुष्यातील आणि परिवाराच्या अनेक आठवणी जुळल्या आहे. तो म्हणालाा की, हे खरंच आहे की, तो एका श्रीमंत घरात जन्माला आला. पण आपल्या परिवाराचा इतिहास, संस्कृती आणि ही सुंदर प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. (सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाला झाले ८ वर्ष पूर्ण , समोर आला त्यांच्या शाही लग्नाचा फोटो)

सैफ अली खानचा हा पटौदी पॅलेस १० एकर परिसरात बांधला आहे. यात तब्बल १५० रूम्स आहेत. ज्यात ७ ड्रेसिंग रूम्स, ७ बेडरूम्स, ७ बिलियर्ड रूम्ससोबत ड्रॉइंग रूम आणि डायनिंग रूमही आहेत. या प्रॉपर्टीची किंमत ८०० कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे. 

फार कमी लोकांना माहीत असेल की, हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टच्या 'इट प्रे लव्ह' सिनेमाचं शूटींग याच पॅलेसमध्ये झालं. त्यासोबतच 'मंगल पांडे', 'वीर झारा', 'गांधी: माय फादर' आणि 'मेरे ब्रदर की दुल्हन' या सिनेमांचं शूटींगही याच पटौदी पॅलेसमध्ये झालं. 
 

Web Title: Know how Saif Ali Khan bought back his Pataudi palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.