जाणून घ्या, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आर. के. स्टुडिओचा इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 06:00 AM2017-09-17T06:00:35+5:302017-09-17T11:30:35+5:30
मुंबईतल्या ६७ वर्षे जुना आर. के. स्टुडिओ काल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मुंबईच्या चेंबूर भागातील हा स्टुडिओ म्हणजे, आठवणींचा एक ...
म ंबईतल्या ६७ वर्षे जुना आर. के. स्टुडिओ काल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मुंबईच्या चेंबूर भागातील हा स्टुडिओ म्हणजे, आठवणींचा एक खजिना आहे. बॉलिवूडचे ‘शो मॅन’ राजकपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओत अनेक चित्रपट चित्रीत झालेत. पण योगायोग म्हणजे, या स्टुडिओमध्ये चित्रीत झालेल्या पहिल्या चित्रपटाचे नावही ‘आग’ होते. आज याच स्टुडिओचा संक्षिप्त इतिहास आपण जाणून घेणार आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि दुस-याच वर्षी म्हणजे १९४८ भारत राज कपूर यांनी मुंबईतल्या चेंबूर परिसरात आर. के. स्टुडिओची स्थापना केली. राज कपूर यांनी स्थापना केल्याने अल्पावधीत या स्टुडिओला एक वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले.
या स्टुडिओत तयार झालेला पहिला चित्रपट म्हणजे,‘आग’. १९४८ मध्ये आलेला ‘आग’ हा चित्रपट व्यावसायिक पातळीवर फार यशस्वी झाला नाही. पण या चित्रपटाने राज कपूर यांना इंडस्ट्रीत पाय रोवण्यास मदत केली. या चित्रपटाचे डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि लीड हिरो सगळेच राज कपूर होते. नरगिस, प्रेमनाथ, निगार सुल्तान आणि कामिनी कौशल यात मुख्य भूमिकेत होते.
या स्टुडिओचा दुसरा सिनेमा १९४९ मध्ये आला. स्वातंत्र्याच्या दोन वर्षांनंतर आलेल्या या चित्रपटाचे यशाचा इतिहास रचला. या चित्रपटात राज कपूरसोबत नरगिस आणि प्रेमनाथ मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट अभिनेत्री निम्मी हिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशानंतर १९५० मध्ये आर. के.चा व्याप प्रचंड वाढला. आजही चित्रपटांशिवाय, लहान-मोठ्या टीव्ही सिरियल्स आणि रिअॅलिटी शोच्या चित्रिकरणासाठी आर. के स्टुडिओलाच पसंती दिली जाते. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘व्हेन हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातले काही दृश्ये आर. के. स्टुडिओमध्येच शूट झाले होते.
या स्टुडिओत चित्रित झालेले चित्रपट चांगलेच गाजले. त्यातले बहुतांश हे राज कपूर म्हणजे आर. के फिल्मचे होम प्रॉडक्शन होते. यानंतर १९५१ मध्ये मधला ‘आवारा’, १९५३ मध्ये आलेला ‘आह’, असे सुपर डुपर हिट चित्रपट आर. के. प्रॉडक्शनने दिले. ‘आवारा’ हा चित्रपट तर राज कपूर यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात कपूर घराण्याच्या तीन पिढ्यांची काम केले. म्हणजेच, राज कपूर, त्यांचे पिता पृथ्वीराज कपूर आणि आजोबा विश्वनाथ या चित्रपटात दिसले. शशी कपूरही या चित्रपटात पहिल्यांदा दिसले.
१९५४ मध्ये आलेला ‘बूट पॉलिश’, १९५५ मधला ‘श्री 420’, त्यानंतर आलेले ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’ अशा गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्येच झाली.६० व ७० च्या दशकातला ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘कल आज और कल’ आणि ‘बॉबी’ सारख्या अनेक चित्रपटांतले महत्त्वाचे सीन आणि गाणी आर. के स्टुडिओमध्येच शूट झाली.
‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘प्रेम ग्रंथ’असे सुपर डुपर हिट चित्रपटांची निर्मितीही आर. के. स्टुडिओमध्येच झाली. आर. के. स्टुडिओचे वैशिष्ट्य म्हणजे इथे शूट होणाºया चित्रपटाचे कॉस्च्युम स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले जातात. राज कपूर यांच्या निधनानंतर आर. के. स्टुडिओची सूत्रे रणधीर कपूर यांच्या हातात आली. सध्या ऋषी कपूर आर. के. स्टुडिओचा कारभार सांभाळतात.