जाणून घ्या श्रीदेवी यांच्यासोबत त्या रात्री काय घडले होते? बोनी कपूर नव्हे तर हॉटेल स्टाफने पाहिले होते त्यांना पहिल्यांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 11:08 AM2018-02-26T11:08:41+5:302018-02-26T16:38:41+5:30
श्रीदेवी यांची अकाली एक्झिट सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठिण जातेय की त्या ...
श रीदेवी यांची अकाली एक्झिट सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठिण जातेय की त्या आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. यूएईमधल्या खलिज टाईम्सच्या रिपोर्टनुसार श्रीदेवी यांच्यासोबत शेवटच्या ३० मिनिटांमध्ये नक्की काय घडले याचा आढावा घेण्यात आला आहे. खलिज टाईम्सयच्या रिपोर्टनुसार श्रीदेवी पती बोनी कपूर यांच्यासोबत डिनरला जाण्यासाठी तयार होत होत्या.
शनिवारी रात्री बोनी कपूर मुंबईतून परत दुबईत गेले. त्यांना श्रीदेवी यांना सरप्राईज डिनरवर घेऊन जायचे होते. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना हॉटेलच्या रुममध्ये जाऊन उठवले आणि १५ मिनिट दोघांनी गप्पा मारल्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवींना डिनरला जाण्यासाठी तयार व्हायला सांगितले. श्रीदेवी तयार होण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या. त्यानंतर १५ मिनिटे त्या बाहेर आल्या नाहीत. मग बोनी कपूर यांनी वॉशरुमचा दरवाजा वाजवला, त्यावर त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बोनी कपूर यांनी तो दरवाजा धक्का देऊन उघडला तर श्रीदेवी या बाथटबमध्ये पडल्या होत्या. बोनी कपूर यांनी त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या उठल्या नाही. बोनींनी यानंतर आपल्या मित्राला फोन केला त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. श्रीदेवी यांना ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, हे स्पष्ट झाले. याच झटक्याने त्यांचे निधन झाले.
पण बोनी कपूर यांनी नव्हे तर हॉटेलमधील एका स्टाफने श्रीदेवी यांना सगळ्यात पहिल्यांदा पाहिले होते असा दावा एका वर्तमानपत्राने केले आहे. दुबईमधील एका वर्तमानपत्राच्यानुसार श्रीदेवी या रूममध्ये एकट्यात राहात होत्या. त्यांच्यासोबत बोनी कपूर नव्हते. रात्री १०.३० वाजता श्रीदेवी यांनी पाण्यासाठी रूम सर्व्हिसला फोन केला होता. १५ मिनिटांत हॉटेलमधील स्टाफ त्यांच्यासाठी पाणी घेऊन आला. पण अनेकवेळा बेल वाजवून देखील त्यांनी दरवाजा न उघडल्यामुळे हॉटेल स्टाफला संशय आला आणि त्याने त्याच्या वरिष्ठांना कळवले. त्यामुळे दरवाजा उघडून स्टाफमधील काही मंडळी रूममध्ये गेले. त्यावेळी
श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या होत्या. त्यांच्या हृद्याचे ठोके त्यावेळी सुरू होते. त्यांना लगेचच रशिद हॉस्पिटमध्ये नेण्यात आले. पण तिथे दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Also Read : फॉरेन्सिक अहवालानुसार या कारणामुळे झाले श्रीदेवी यांचे निधन