रातोरात बनली होती स्टार, एका घटनेमुळे बदलले आशिकी फेम अन्नू अग्रवालचे आयुष्य, आता अज्ञातवासात आहे ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:56 IST2021-03-30T15:54:41+5:302021-03-30T15:56:10+5:30
Anu Agrawal was playing lead role with Rahul Roy in Aashiqui movie.अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये आशीकी टीमसह तिने अहजेरी लावली होती. तिला बघून ही एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री अन्नू अग्रवाल आहे, हे ओळखणं कठीण झालं होतं.

रातोरात बनली होती स्टार, एका घटनेमुळे बदलले आशिकी फेम अन्नू अग्रवालचे आयुष्य, आता अज्ञातवासात आहे ही अभिनेत्री
आशिकी सिनेमामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे रुबीना कुरेशी. एका सिनेमामुळे अन्नू देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली. यशाच्या शिखरावर असतानाच १९९९ मध्ये तिच्या गाडीला एक अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ती जवळजवळ एक महिना ती कोमात होती.
कोमातून बाहेर आल्यावरही अनेक महिने तिला उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बदलला. या अपघातानंतर अन्नू संपूर्णपणे बॉलिवूडपासून दूर गेली. तिने कधीच कोणत्या सिनेमात काम केले नाही.…छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये अन्नूने यशोशिखर गाठले होते.
सध्या अन्नू अग्रवाल फिल्मी दुनियेपासून अज्ञातवासात आयुष्य व्यतित करत आहे. अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये आशीकी टीमसह तिने अहजेरी लावली होती. तिला बघून ही एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री अन्नू अग्रवाल आहे, हे ओळखणं कठीण झालं होतं.
राहूल रॉय व अन्नू अगरवाल या नवोदीत जोडीच्या आशिकीने इतिहास घडवल्यानंतर आशिकी २ मध्ये श्रद्धा कपूर व आदित्य रॉय कपूर झळकले होते. मात्र, आशिकी ३ मध्ये नव्या चेह-यांना संधी न देता फेमस चेहरे घेण्याचं निर्मात्यांनी निश्चित केल्याचं वृत्त एका फिलमी मॅगेझिनने दिलं आहे.