​जाणून घ्या का ताणली होती विनोद खन्नाच्या वडिलांनी त्यांच्यावर बंदूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 07:57 AM2017-04-27T07:57:45+5:302017-04-27T13:27:45+5:30

विनोद खन्ना यांना नेहमीच अभिनयसृष्टीत कारकिर्द करायची होती. पण त्यांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळावा असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते. ...

Know what was the tension Vinod Khanna's father gun on them | ​जाणून घ्या का ताणली होती विनोद खन्नाच्या वडिलांनी त्यांच्यावर बंदूक

​जाणून घ्या का ताणली होती विनोद खन्नाच्या वडिलांनी त्यांच्यावर बंदूक

googlenewsNext
नोद खन्ना यांना नेहमीच अभिनयसृष्टीत कारकिर्द करायची होती. पण त्यांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळावा असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते. विनोद यांना न सांगताच त्यांनी त्यांचे अॅडमिशन सिडनम कॉलेजमध्ये केले होते. विनोद यांनी अभिनयापासून दूर राहावे यासाठी त्यांच्या वडिलांनी अनेक प्रयत्न केले. त्यांचे वडील खूप कडक होते. पार्टींना किंवा मित्रांसोबत बाहेर फिरायला जायला ते त्यांना परवानगी देत नसत.पण विनोद यांनी त्यांचा हट्टीपणा सोडला नाही. सुरुवातीला विनोद कॉलेजला जायलाच तयार नव्हते. पण तिथे गेल्यावर तिथल्या वातावरणात ते रमले. 
कॉलेज हे कंटाळवाणे असेल असे विनोद यांना वाटले होते. पण तिथे गेल्यावर त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. आपल्या कॉलेजच्या आयुष्याविषयी त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मी कॉलेजमध्ये अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर तिथे अनेक प्रेयसी बनवल्या. मुलींच्या घोळक्यातच मी असायचो. त्याचदरम्यान माझी गितांजलीशी ओळख झाली. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो. कॉलेजमध्ये असताना एका पार्टीत मला सुनील दत्त यांना भेटायची संधी मिळाली. त्यांनी मला त्याच पार्टीत पहिल्या चित्रपटाची ऑफर दिली. पण चित्रपटात काम करण्यास माझ्या वडिलांचा विरोध होता. त्यांनी माझ्या डोक्यावर अक्षरशः बंदूक धरली होती. पण माझ्या आईने त्यांना समजावले आणि मला चित्रपटसृष्टीत येण्याची संधी मिळाली. 
मन का मीत का चित्रपट प्रदर्शित झाल्यावर केवळ एका आठवड्यात मी 15 चित्रपट साइन केले. मला मिळालेल्या यशानंतर मी आणि गितांजलीने लग्न करायचे ठरवले. पण मी अभिनेता असल्याने कोणीच मला घर विकायला तयार नव्हते. हा एक वेगळा अनुभवदेखील त्यावेळी मी घेतला होता. घर घेतल्यावर मी आणि गितांजलीने लग्न केले. लग्नानंतर एकाच वर्षांत राहुल आमच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर अक्षय. मी चित्रपटाच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असलो तरी त्याकाळात रविवारी काम करत नसे. रविवार हा केवळ माझ्या कुटुंबियांसाठी असे. 


Web Title: Know what was the tension Vinod Khanna's father gun on them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.