वयाच्या 44 वर्षांनंतरही मल्लिका शेरावत अविवाहित, काय आहे यामागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 09:00 AM2021-10-03T09:00:00+5:302021-10-03T09:00:00+5:30
मल्लिकाने 2003 मध्ये 'ख्वाहिश' या चित्रपटातून पदार्पण केले होते.
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे.त्याला कारणीभूत ठरला तिचा लग्नाचा विषय.मल्लिका शेरावत लग्न कधी करणार याकडे सगळ्यांचाच नजरा लागलेल्या असताना तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, आई म्हणते लग्न कर, तुला मोठे होण्यासाठी मदत मिळेल.यावर मलायका म्हणते, पण मी अजून लग्नाचा विचार केलेला नाही.मला लग्नात रस नाही.
तिचे खरे नाव रीमा लांबा आहे. चित्रपटांमध्ये करिअर बनवण्यासाठी नावात बदल करुन तिने मल्लिका ठेवले होते आणि शेरावत हे तिच्या आईचे आडनाव होते, जे तिने तिच्या नावासोबत जोडले. तिच्या आईने मल्लिका खूप सोपर्ट केला.पण तिच्या वडीलांना मल्लिका हिरोईन बनण्याच्या विरोधात होते.
अभिनयाची आवड असलेल्या मल्लिकाने मोठ्या मेहनतीने तिचे स्थान निर्माण केले. मल्लिका फिल्मी करिअरप्रमाणे तिच्या खासगी कारणामुळेही चर्चेत असते. मुळात स्वतःला अविवाहीत समजणारी मल्लिका विवाहीत असल्याचे बोलले जाते. लग्नानंतर मल्लिका स्वतःला कुमारिका असल्याचा दावा करते.
असे म्हटले जाते की तिचे लग्न दिल्लीतील पायलट करण सिंह गिलशी 1997 मध्ये झाले होते. मात्र हे लग्न फार काळ काही टिकले नाही. लग्नाच्या 4 वर्षातच दोघांचे नाते तुटले आणि 2001 मध्ये घटस्फोट घेत वेगळे झाले होते. एवढेच नाही तर असेही म्हटले जाते की मल्लिकाला एक मुलगाही आहे, पण सत्य काय आहे हे कोणालाच माहीत नाही. वास्तविक, मल्लिकाला लहानपणापासूनच मोठी स्वप्ने होती आणि तिला नायिका बनण्याची इच्छा होती. या हेतूने ती हरियाणा सोडून मुंबईत स्थायिक झाली.
मल्लिकाने 2003 मध्ये 'ख्वाहिश' या चित्रपटातून पदार्पण केले होते. याशिवाय 'किस किस की किस्मत' (2004), 'मर्डर' (2004), 'प्यार के साइड इफेक्ट्स' (2006), 'शादी से पहले' (2006), 'वेलकम' (2007), हिस्स (2010), 'डबल धमाल' (2011), बिन बुलाए बराती (2011), 'तेज' (2012), डर्टी पॉलिटिक्स (2015), टाइम रेडर्स (2016) चित्रपटांमध्ये काम केले आहे.