जेव्हा सलमाने ऐश्वर्याकडे ठवेली होती एक विचित्र अट, मान्य केले नाही म्हणून नात्यात आला दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:04 PM2021-12-21T16:04:00+5:302021-12-21T16:04:25+5:30
सलमान खान (salman Khan) आणि ऐश्वर्या राय(Aishwarya Rai Bachchan). दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा त्या काळी रंगल्या होत्या.हे दोघेही आपापल्या आयुष्यात फार पुढे निघून गेले असले तरी, आजही दोघांच्या अफेअरवर उलटसुलट चर्चा होत असतात.
ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai Bachchan)अभिनयाची खरी झलक दिसली तिनं साकारलेल्या नंदिनीमध्ये.दिग्दर्शक संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) यांचा 'हम दिल दे चुके सनम'(Hum Dil De Chuke Sanam). 1999 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या सिनेमानं ऐश्वर्या रायला नवी ओळख मिळवून दिली.'हम दिल दे चुके सनम'च्या या नंदिनीनं ऐश्वर्या फक्त एक शोभेची बाहुली अशी टीका करणा-यांची तोंडं कायमची बंद करुन टाकली.
प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्यासाठी नव-याला सोडून सातासमुद्रापार जाण्याची तयारी असलेली या नंदिनीनं रसिकांवर जादू केली.सिनेमात ऐश्वर्याच्या अभिनय कौशल्यासोबतच डान्सचंही तितकंच कौतुक झालं.या सिनेमानं रसिकांवर जादू केली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं.
हम दिल दे चुके सनमच्या यशानंतर सुभाष घईंच्या ताल सिनेमात ऐश्वर्या झळकली.या सिनेमात ऐश्वर्यानं साकारलेली मानसी ही प्रेयसी आणि गायिका भाव खाऊन गेली.हम दिल दे चुके सनम आणि तालच्या यशानंतर ऐश त्या काळातली बिझी एक्ट्रेस बनली.. ऐशचे एकामागून एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकत होते.जोश सिनेमात ऐशनं किंग खान शाहरुखच्या जुळ्या बहिणीची भूमिका साकारली.. मात्र जोशचा जोश बॉक्सऑफिसवर काही राहिला नाही..
'हम दिल दे चुके सनम'मध्ये नंदिनी आणि समीरचा ऑन स्क्रीन रोमान्स सुरु असताना ऑफ स्क्रीनही दोन हृदय एकमेंकामध्ये गुंतले होते... ते म्हणजे सलमान खान (salman Khan) आणि ऐश्वर्या राय(Aishwarya Rai Bachchan). दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा त्या काळी रंगल्या होत्या.हे दोघेही आपापल्या आयुष्यात फार पुढे निघून गेले असले तरी, आजही दोघांच्या अफेअरवर उलटसुलट चर्चा होत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानला त्याची गर्लफ्रेंड ऐश्वर्याकडून हवे असलेल्या वचनामुळे दोघांचे नाते तुटले आणि ऐश्वर्या सलमानला ते वचन देऊ शकली नाही. सलमान त्यावेळी स्टार झाला होता आणि त्याने आयुष्यात खूप काही पाहिले होते.
सलमानला ऐश्वर्यासोबत लग्न करायचे होते. त्यासाठीच त्याने तिच्याकडे लग्नाचे वचन मागितले होते. मात्र ऐश्वर्या कोणतेही वचन देण्यास तयार नव्हती. तिच्या करिअरला नुकतीच सुरुवात झाली होती. पुढे तिच्या करिअरमध्ये तिला खूप काही कराचे होते. लग्नबंधनात अडकण्याचा तिचा कोणताही विचार नव्हता.दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.मात्र 2001 साली दोघांच्या प्रेमकहाणीत आलं मोठं वादळ.सलमान खाननं मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं ऐश्वर्याचं कथित विधान एका इंग्रजी दैनिकानं छापलं.त्यानंतर दोघांच्याही नात्यात कायमचा दुरावा आला.