Samantha-Naga Chaitanya Divorce,घटस्फोट घेत असल्याचे केलं जाहीर, ४ वर्षांचं नातं संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 04:48 PM2021-10-02T16:48:27+5:302021-10-02T16:52:38+5:30
नागा चैतन्यने सोशल मीडियावर दोघेही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चार वर्षांचे दोघांचे नाते आता संपुष्टात आले आहे.
तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचे सर्वात क्युट कपल म्हणून समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्यला ओळखले जात होते. दोघांमधली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती.मात्र गेल्या वर्षापासून दोघांचे बिनसल्याचे चर्चा होत्या. गेल्या काही दिवसांपासून दोघेही वेगळेच राहत होते.गेल्या वर्षापासून त्यांचे नाते बिघडल्याचे चर्चा जोर धरत होता. मात्र जुलै महिन्यात सोशल मीडियावरु समंथाने सासरचे आडनाव ‘अक्किनेनी’ हटवले होते. तेव्हापासून दोघांच्या नात्यात फुट पडल्याचे चाहते तर्कवितर्क लावले जात होते. घटस्फोटाच्या चर्चांवर मात्र समांथा आणि नागाचैत्य दोघांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते.
अखेर आज नागा चैतन्यने सोशल मीडियावर दोघेही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चार वर्षांचे दोघांचे नाते आता संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे लग्नापूर्वी काही वर्ष दोघेही एकमेकांना डेट करत होते.
दोघांच्या आवडी-निवडी पटल्यानंतरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 6 अक्टूबर 2017 मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले होते. दोघे 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ सिनेमात पहिल्यांदा एकत्र झळकले होते. तेव्हापासून दोघांनाही ऑनस्क्रीन पाहणे चाहत्यांनानेहमीच आवडायचे.
— chaitanya akkineni (@chay_akkineni) October 2, 2021
लग्नानंतर सामंथाने तिचे सिनेमा करिअर सुरु ठेवले होते. सिनेमात बोल्ड सीन्स देणे,इतकेच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची.हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. समांथाला याविषयी अनेकदा दोघांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर समांथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती.
समांथाला तिच्या घरच्यांचा कामासाठी विरोध करणे खटकत होते. अखेर याच कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाल्याचे बोलले जाते.येत्या काही दिवसांत घटस्फोटाची प्रकियाही सुरु होणार आहे. घटस्फोट झाल्यानंतर समांथाला पोटगी म्हणून 50 कोटी रुपये देण्यात येतील असेही बोलले जाते.
घटस्फोट घेत असले तरी मैत्री मात्र कायम राहणार असल्याचेही नागा चैतन्यने म्हटले आहे. पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाने कितने अजीब रिश्ते है..याच गाण्याच्या ओळी आपसुकच आठवतील हे मात्र नक्की.