आमिर खानची पत्नी किरण राव व एक्स-वाईफ रीना दत्त यांच्यातील मैत्रीमागे हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 09:54 AM2018-11-05T09:54:42+5:302018-11-05T10:01:12+5:30

आमिरची पत्नी किरण राव आणि एक्स वाईफ रीना दत्ता यांच्यात चांगली मैत्री आहे, या मैत्रीमागचे कारणही आमिरने यावेळी सांगितले.

Koffee With Karan 6 : aamir khan reveals the reason of friendship between his ex wife reena dutta and kiran rao | आमिर खानची पत्नी किरण राव व एक्स-वाईफ रीना दत्त यांच्यातील मैत्रीमागे हे आहे कारण!!

आमिर खानची पत्नी किरण राव व एक्स-वाईफ रीना दत्त यांच्यातील मैत्रीमागे हे आहे कारण!!

googlenewsNext

आमिर खान सध्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान आमिरने अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी आमिर कधी नव्हे इतका मनमोकळेपणाने बोलताना दिसला. केवळ इतकेच नाही तर त्याने या शोमध्ये धम्माल मस्ती केली. आमिरची पत्नी किरण राव आणि एक्स वाईफ रीना दत्ता यांच्यात चांगली मैत्री आहे, या मैत्रीमागचे कारणही आमिरने यावेळी सांगितले. आमिरने सांगितले की, रीना व माझे लग्न १६ वर्षे चालले. आमचे नाते तुटले, तेव्हा तो क्षण माझ्या व माझ्या कुटुंबासाठी कुठल्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. आम्ही केवळ या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचे प्रयत्न केलेत. विभक्त झाल्यानंतरही मी आणि रीना आम्ही दोघांच्या मनातील एकमेकांप्रतीचा आदर जराही कमी झालेला नाही. रीना आणि किरण दोघीही अतिशय प्रगल्भ आहेत, मनाने मोठ्या आहेत. त्यांच्यात मैत्री व्हावी, यासाठी मी खास असे कुठलेही प्रयत्न केले नाहीत, असे आमिरने यावेळी सांगितले.
‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच आमिर व रीनाचे लग्न झाले होते. चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत लग्नाची गोष्ट लपवून ठेवण्याची गळ निर्मात्यांनी आमिरला घातली होती. पण आमिर ही अट मानायला तयार नव्हता. चित्रपटाच्या एका गाण्यात रीनाचा एक सीन शूट केला गेला, तेव्हा कुठे आमिर मानला.
रीनाबद्दलही आमिर बोलला. मी रिनाचा आभारी आहे की, तिने मला तिच्यासोबत आयुष्य घालवण्याची संधी दिली. तिने मला अनेकार्थाने संपन्न केले. आमचे लग्न झाले तेव्हा आम्ही खूप तरूण होतो, असे आमिर म्हणाला.

Web Title: Koffee With Karan 6 : aamir khan reveals the reason of friendship between his ex wife reena dutta and kiran rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.