करण जोहरने मागितली अजय देवगण व काजोलची माफी, वाचा बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 10:00 AM2018-12-03T10:00:54+5:302018-12-03T10:02:58+5:30
होय, ‘ कॉफी विद करण 6’ या आपल्या शोमध्ये करणने अजय व काजोलला बोलवले होते. या शोदरम्यान करणने काजोल व अजय दोघांचीही माफी मागितली.
करण जोहर, काजोल व अजय देवगण यांच्यात पुन्हा पॅचअप झालेय. पण २०१६ मध्ये करण व काजोल यांच्यातील भांडण चांगलेच विकोपाला गेले होते. करणने काजोलसोबतच्या या भांडणासाठी तिचा पती अजय देवगण याला जबाबदार ठरवले होते. होय, करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजयचा ‘शिवाय’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर एकाचवेळी प्रदर्शित होणार होते. या रिलीजवरून करण व अजय दोघांत वाद झाला होता. बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठी दोघांनीही आपआपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यास नकार दिला होता. चित्रपटाच्या बिझनेसवरही याचा परिणाम झाला होती. अजय व करणच्या या भांडणात करण व काजोलची मैत्रीही तुटेपर्यंत ताणली गेली होती. इतकी की, आता माझ्यात व काजोलमध्ये कुठलीही मैत्री नाही, असे करणने जाहिर करून टाकले होते. आपल्या आॅटोबायोग्राफीत त्याने काजोलसोबतच्या भांडणाचा उल्लेख केला होता. पण आता सगळे मतभेद मिटले आहेत आणि करणने अगदी नॅशनल टीव्हीवर याबद्दल काजोलची माफी मागितली आहे.
Real life antics trump reel life drama when you're @ajaydevgn and @KajolAtUN! #KoffeeWithKaran#KoffeeWithAjay#KoffeeWithKajolpic.twitter.com/zr8EFPSOL2
— Star World (@StarWorldIndia) November 25, 2018
होय, ‘ कॉफी विद करण 6’ या आपल्या शोमध्ये करणने अजय व काजोलला बोलवले होते. या शोदरम्यान करणने काजोल व अजय दोघांचीही माफी मागितली. काजोलसोबतच्या वादाचा आपल्या पुस्तकात उल्लेख केला, याबद्दल मला खेद आहे, असे करण म्हणाला. यावर अजयनेही आपली बाजू स्पष्ट केली. मी अनेकदा तुझ्यासोबत बोलून हे भांडण मिटवण्याचे काजोलला सुचवले होते. अखेर तिने तुला तिच्या वाढदिवसाला बोलवले आणि भांडण मिटले, असे अजय म्हणाला.
काजोज व करण खूप जुने मित्र आहेत. त्यामुळे ते फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकले नाही. आता ही मैत्री अशीच कायम राहावी, अशी कामना करूया.