लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:50 AM2019-03-12T10:50:01+5:302019-03-12T10:57:37+5:30
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कपल बॉलिवूडमधले परफेक्ट कपलपैकी एक आहे. दोघे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
ठळक मुद्देरणवीर सिंग कॉफी विथ करणच्या 6व्या सीझनमध्ये येऊन गेलादीपिका मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या तयारीमध्ये बिझी आहे
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कपल बॉलिवूडमधले परफेक्ट कपलपैकी एक आहे. दोघे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर दीपवीरची जोडी नेहमी एकमेकांना सपोर्ट करताना दिसते. सध्या दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत.
रणवीर सिंग कॉफी विद करणच्या 6व्या सीझनमध्ये येऊन गेला. शोदरम्यान करण जोहरने रणवीरला विचारले तुला दीपिकाची कोणती सवय बदलायची आहे. यावर रणवीर म्हणाला, तिने चिल रहायला शिकावे. रणवीरने हे वक्तव्य लग्नाच्या आधी केले होते.
वर्कफ्रंटबदल बोलायचे झाले तर दीपिका सध्या मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या तयारीमध्ये बिझी आहे. या सिनेमात दीपिका अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष पडद्यावर दाखवणार आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. लवकरच दीपिका सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मेघना गुलजार 'राजी', 'तलवार' अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या 'राजी' या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. 'राजी'नंतर मेघना अॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय.