Koffee With Karan 7: कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 04:01 PM2022-09-12T16:01:48+5:302022-09-12T16:02:27+5:30

Koffee With Karan 7: अनिल कपूर हे बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते. वाढत्या वयाची एकही खुण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. साहजिकच त्यांच्या या सदाबहार दिसण्याचं रहस्य काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. करण जोहरलाही तो पडला...

Koffee With Karan 7 anil kapoor reveals secret behind his younger looks | Koffee With Karan 7: कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स...

Koffee With Karan 7: कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स...

googlenewsNext

करण जोहर (Karan Johar ) होस्ट करत असलेला ‘कॉफी विद करण 7’  (  Koffee With Karan 7) हा चॅट शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. करणच्या या शोमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी येतात आणि आपल्या पर्सनल लाईफबद्दलचे नवनवे खुलासे करतात. शोच्या नव्या एपिसोडमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि वरूण धवन (Varun Dhawan) यांनी  हजेरी लावली आणि यानिमित्ताने अनिल कपूर यांनी एक मोठा खुलासा केला.

होय, ‘कॉफी विद करण 7’चा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोत अनिल कपूर यांनी एक गुपित उघडं केलं आहे. अनिल कपूर हे बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते आहे. वाढत्या वयाची एकही खुण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. साहजिकच त्यांच्या या सदाबहार दिसण्याचं रहस्य काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. करण जोहरलाही तो पडला. कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण ठेवतात? असा प्रश्न यामुळेच करणने अनिल कपूर यांना केला आणि यावर अनिल कपूर यांचं उत्तर ऐकून चाट पडला.

कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण ठेवतात? असा प्रश्न करण या प्रोमोमध्ये अनिल यांना विचारताना दिसत आहे. यावर  सेक्स, सेक्स, सेक्स..., असं उत्तर अनिल कपूर देतात. त्यांचं हे उत्तर ऐकून करण जोहर व वरूण धवन दोघंही हसायला लागतात. एकमेकांकडे बघतात. करण व वरूणची ही रिअ‍ॅक्शन बघून  ‘हे सगळं  स्क्रिप्टेड आहे’, असं म्हणत अनिल कपूर सारवासारव करतात.

वरूणला करायचं नाही दीपिका व कतरिनासोबत काम!!
कतरिना व दीपिका पादुकोण यांच्यापैकी कुणासोबत काम करायला आवडते? असा प्रश्न करण वरूण धवनला करतो. यावर वरूण भलतंच उत्तर देतो. मी बच्चा दिसतो, असं मला सगळे म्हणतात, असं वरूण म्हणतो. त्याचं ते उत्तर ऐकून, म्हणजे कतरिना व दीपिका तुझ्यापेक्षा मोठ्या दिसतात, असं तुला म्हणायचं आहे का? असा उलट सवाल करण वरूणला करतो. यावर मी लहान दिसतो, एवढंच मी म्हणालो, असं वरूण म्हणतो. करण या उत्तरावरही त्याला डिवचतो. म्हणजेच, त्या तुझ्यापेक्षा मोठ्या दिसतात, असंच ना? असं करण म्हणतो. वरूण बिचारा यावर काय बोलणार? हे मी म्हणत नाहीये, तूच म्हणतोय, एवढं बोलून तो स्वत:ला आवरतो.
  

Web Title: Koffee With Karan 7 anil kapoor reveals secret behind his younger looks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.