Koffee with karan 7: केवळ या कारणामुळे बॉलिवूड साऊथ इंडस्ट्रीपेक्षा मागे, सांगितली कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 10:52 AM2022-07-22T10:52:48+5:302022-07-22T10:56:11+5:30
करण जोहरने पॅन इंडियाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची यादी देखील दाखवली ज्यामध्ये सामंथा पहिल्या क्रमांकावर आणि आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर होती.
दिग्दर्शक करण जोहरचा सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण सीझन 7' चा तिसरा भाग 21 जुलै 2022 रोजी OTT वर प्रसारित झाला आहे. करण जोहरच्या चॅट शोमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि साऊथ अभिनेत्री समंथा प्रभू यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करणच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर चर्चा केली.करण जोहरने शोच्या सुपरस्टार पाहुण्यांचे स्वागत केले आणि अक्षय कुमारने समांथाला आपल्या मिठीत घेतले. समंथाने सांगितले की, शोमध्ये येण्यापूर्वी ती खूप नर्व्हस होती. अक्षय कुमारला याचे कारण विचारले असता तिने सांगितले की, बॉलीवूडच्या रॉयल स्टार्सना भेटून ती थोडी घाबरली होती. यावर अक्षयने करण जोहरवर निशाणा साधत रॉयल मॅन फक्त करण जोहर असल्याचे सांगितले.कॉफी विथ करणच्या सीझन 7मध्ये अक्षय कुमारने अनेक गोष्टी सांगितल्या ज्या सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडतील.
करण जोहरने शोमध्ये ओमॅक्सची पॅन इंडिया नंबर 1 स्टार लिस्ट दाखवण्यात आली. त्यात विजय, ज्युनियर एनटीआर, प्रभास आणि अल्लू अर्जुन यांच्यासह 10 स्टार्सचा समावेश होता आणि त्यात फक्त बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव होते.ही यादी पाहून अक्षय म्हणाला की मी म्हणेन की आपल्याला अजून मेहनत करण्याची गरज आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत असे कलाकार आहेत ज्यांना दोन-तीन स्टार्स घेऊन चित्रपट करायचा नाही, पण साऊथ इंडस्ट्रीत तसे नाही. इथे मी स्वतः एक चित्रपट बनवला पण इथे कलाकार दोन हिरो चित्रपट करत नाहीत.साऊथ इंडस्ट्रीत दोन हिरो असले तरी त्या सिनेमांना चांगलाच प्रतिसाद मिळतो.म्हणूनच या यादीत आपण नाही तर साऊथचे स्टार्स आपल्यापेक्षा पुढे आहेत हे याच कारण आहे, अशी कबुली अक्षय कुमारने दिली.
करण जोहरने पॅन इंडियाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची यादी देखील दाखवली ज्यामध्ये सामंथा पहिल्या क्रमांकावर आणि आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर होती. बॉलिवूडने असे काही नियम स्वतःला लावून घेतले आहेत ज्याची खरंच गरज नाही. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करण्याची पद्धतीही खूप वेगळ्या आहेत. बॉलिवूडनेसुद्धा दाक्षिणात्य सिनेसृष्टीसारखे काम करण्याची गरज आहे.