Koffee With Karan 7 : त्यापेक्षा वाईट काहीच...., आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर गौरी खान पहिल्यांदाच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 11:39 AM2022-09-22T11:39:46+5:302022-09-22T11:40:20+5:30
Koffee With Karan 7, Gauri Khan : आर्यन तुरुंगात असताना शाहरूखची तहानभूक, झोप सर्व उडाली होती. आई गौरी खानची अवस्थाही वेगळी नव्हती. या सगळ्या प्रकरणावर शाहरूख वा गौरी कधीही काही बोलले नव्हते. पण आता गौरी खान पहिल्यांदाच यावर व्यक्त झाली आहे...
शाहरूख खान (Shah Rukh Khan) व गौरी खानचा (Gauri Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेल्यावर्षी अटकेच्या कारवाईमुळे चर्चेत राहिला. आर्यनला ऑक्टोबर 2021मध्ये मुंबई क्रुज ड्रग्ज केस प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो अनेक दिवस जेलमध्ये होता. परंतु, नंतर एनसीबी या प्रकरणात त्याला क्लीन चीट दिली. आर्यन तुरुंगात असताना शाहरूखची तहानभूक, झोप सर्व उडाली होती. आई गौरी खानची अवस्थाही वेगळी नव्हती. या सगळ्या प्रकरणावर शाहरूख वा गौरी कधीही काही बोलले नव्हते. पण आता गौरी खान पहिल्यांदाच यावर व्यक्त झाली आहे.
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7 ’ (Koffee With Karan 7)या शोमध्ये गौरी खानने हजेरी लावली होती. यावेळी गौरीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाविषयी अनेक खुलासे केलेत. गौरीने आर्यन, सुहाना आणि अबराम या आपल्या मुलांबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात अडकला होता, त्याबद्दलही ती बोलली. तो काळ आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण काळ होता, असं गौरी म्हणाली.
my most favorite part of the entire episode ... the husband talk ♥️ @iamsrk My Jaan is the gentlest Husband of this world. That ease & comfort is all that a woman wants @gaurikhan 🥺 gaurimaa is so cute screaming over such household chores 🤌🏼#GauriKhanpic.twitter.com/QPNPJ8Bopn
— ❥ Sнαн ᏦᎥ Ᏸ𝐢ω𝐢 𓀠 (@JacyKhan) September 21, 2022
काय म्हणाली गौरी
करणने गौरीला आर्यन खान प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला. यावर, ‘तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. ज्या प्रसंगातून आम्ही गेलो आहोत, त्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. पण आम्ही एक कुटुंब म्हणून एकमेकांसोबत उभे आहोत. आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांप्रती प्रेम आहे. आता आम्ही कोणत्याही प्रसंगाचा मिळून धीराने सामना करू शकतो. या कठीण प्रसंगात अनेक मित्र-मैत्रिणी आमच्याबरोबर होते. परंतु, ज्यांना आम्ही ओळखत नव्हतो अशाही काही लोकांची साथ मिळाली. अनेकांचे मेसेज यायचे. या सगळ्यांची मी आभारी आहे,’ असं गौरी म्हणाली.
ड्रग्जप्रकरणी आर्यन 25 दिवस तुरूंगात राहिला. यानंतर त्याची जामीनावर सुटका झाला. पाठोपाठ त्याला सर्व आरोपातील क्निनचीट मिळाली.
The love to King Khan and the family during the tough time makes the family feel blessed ♥️🙏 #ShahRukhKhan#GauriKhan#KoffeeWithKaran@gaurikhanpic.twitter.com/6gc8gny5UQ
— Abdul-Wadood 1️⃣ 0⃣🙌🏾👍🏾👏🏾👌🏾👍🏿✌🏿 🇵🇰💟 (@AWadood97) September 21, 2022
शाहरूखची पत्नी असल्याची शिक्षा...
शाहरूख खानची बायको असण्याचा तोटा मला अनेकदा सहन करावा लागतो. मी एक इंटिरिअर डिझाईनर आहे. अनेक लोक माझ्या कामाची कदर करतात. पण अनेक लोक असेही आहेत, ज्यांना शाहरूखच्या बायकोसोबत काम करण्याचं प्रेशर नको असं. त्यामुळे अनेक लोक मला काम देत नाहीत, असंही गौरी खान या शोमध्ये म्हणाली.