Koffee With Karan 7 : ‘त्या’ दिवशी वाटलं शाहिदच्या एक कानाखाली द्यावी..., कियारा अडवाणीचा शॉकिंंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:43 PM2022-08-24T17:43:41+5:302022-08-24T18:09:10+5:30

Koffee With Karan 7 : ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या सेटवर कियाराला शाहिदच्या एक कानाखाली द्यायची इच्छा झाली होती.  ‘कबीर सिंग’ची स्टोरी तशीही आक्रमक होती. पण कारण हे नव्हतं. पडद्यामागे भलतंच काही घडलं होतं...

Koffee With Karan 7 Kiara Advani felt like slapping Shahid Kapoor on Kabir Singh set | Koffee With Karan 7 : ‘त्या’ दिवशी वाटलं शाहिदच्या एक कानाखाली द्यावी..., कियारा अडवाणीचा शॉकिंंग खुलासा

Koffee With Karan 7 : ‘त्या’ दिवशी वाटलं शाहिदच्या एक कानाखाली द्यावी..., कियारा अडवाणीचा शॉकिंंग खुलासा

googlenewsNext

करण जोहरचा ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) हा शो सध्या भलताच चर्चेत आहे. या शोचा प्रत्येक नवा एपिसोड येतो आणि नवे नवे खुलासे होतात. कधी सेलिब्रिटींची लव्हस्टोरी, कधी डेटिंग, कधी सेक्स लाईफ आणि बरंच काही चाहत्यांना कळतं. आता ‘कॉफी विद करण 7’च्या 8 व्या एपिसोडमध्ये ब्युटिफुल कियारा अडवाणी ( Kiara Advani) आणि हँडसम शाहिद कपूर (Shahid Kapoor ) करणच्या कॉफीला येणार आहेत. साहजिकच या एपिसोडमध्ये देखील प्रेम, कुटुंब, लग्न, बॉलिवूड, सेक्स या सगळ्यांवर खुलासे होणार आहे. एक शॉकिंग खुलासा आम्ही आत्ताच करतोय.

होय, कियारा अडवाणीने या एपिसोडमध्ये शाहिद कपूरबद्दल एक शॉकिंग खुलासा केला आहे. ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या सेटवर कियाराला शाहिदच्या एक कानाखाली द्यायची इच्छा झाली होती.  ‘कबीर सिंग’ची स्टोरी तशीही आक्रमक होती. पण कारण हे नव्हतं. पडद्यामागे भलतंच काही घडलं होतं. कियाराने स्वत: शाहिदसमोर याचा खुलासा केला.

‘कबीर सिंगचं शूटींग सुरू होता. शूटींगचा तिसरा वा चौथा दिवस होता आणि त्या दिवशी शाहिदच्या एक थोबाडीत द्यावी, असं मला वाटलं होतं.  मी प्रचंड संतापले होते. कारणही तसंच होतं. सेटवर मला शाहिदची 8 तास प्रतीक्षा करावी लागली होती. का? तर पुढच्या सीनमध्ये शाहिद कोणते जोडे घालणार, यावर चर्चा सुरू होती...,’असं कियाराने या शोमध्ये सांगितलं. कियाराने हे सांगताच करण जोहरही हैराण झाला. त्यानेही कियाराची बाजू घेतली. ‘चपला-जोड्यांवरच्या चर्चेसाठी मलाही कुणी 8 तास वाट पाहायला लावली असती तर मी सुद्धा थोबाडीत मारली असती,’ असं करण जोहर म्हणाला.  बिचारा शाहिद कपूर तो काय बोलणार? त्याने फक्त हसून वेळ मारून नेली.

Web Title: Koffee With Karan 7 Kiara Advani felt like slapping Shahid Kapoor on Kabir Singh set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.