Koffee with Karan 7 : रणवीर सिंगचा सेक्स लाईफबद्दलचा खुलासा; करण जोहर व आलिया ऐकून शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 11:59 AM2022-07-08T11:59:21+5:302022-07-08T12:02:42+5:30

Koffee with Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’ चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंगने आपल्या पर्सनल लाईफबद्दल बिनधास्त खुलासे केले. सेक्स लाईफ, बेडरूम सीक्रेट्स सगळ्यांबद्दल तो बोलला.

Koffee with Karan 7 Ranveer Singh reveals had sex in vanity Karan Johar shocked | Koffee with Karan 7 : रणवीर सिंगचा सेक्स लाईफबद्दलचा खुलासा; करण जोहर व आलिया ऐकून शॉक्ड

Koffee with Karan 7 : रणवीर सिंगचा सेक्स लाईफबद्दलचा खुलासा; करण जोहर व आलिया ऐकून शॉक्ड

googlenewsNext

Koffee with Karan 7 : काल गुरूवारी ‘कॉफी विद करण 7’चा पहिला एपिसोड स्ट्रिम झाला. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) हे दोघे करणच्या पहिल्या एपिसोडचे पहिले गेस्ट ठरले. पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंगने आपल्या पर्सनल लाईफबद्दल बिनधास्त खुलासे केले. सेक्स लाईफ, बेडरूम सीक्रेट्स सगळ्यांबद्दल तो बोलला. मग काय त्याचीच चर्चा रंगली.

बिंगो गेममध्ये रणवीरने लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स केल्याची कबुली दिली. इतकंच नाही तर व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स केल्याचा खुलासाही त्याने केला. रणवीरचं हे सीक्रेट ऐकून करण जोहर (Karan Johar) व आलिया दोघंही शॉक्ड झालेत.

‘शूटींगदरम्यान आम्ही आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स केला. माझ्याकडे सेक्ससाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत,’असं रणवीर बिनधास्त बोलून गेला. हे ऐकून करण जोहर थक्क झाला. हे कसं झालं? तुला भीती वाटली नाही? कोणी व्हॅनिटीमध्ये येईल, म्हणजे सिक्युरिटी वगैर? असं त्याने विचारलं. यावर, ‘असं करण्यात रिस्क असते. पण हे एक्सायटिंग आहे’, असं रणवीर म्हणाला.
लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स केल्याचंही त्याने सांगितलं.  लग्नाच्या सगळ्या विधी होईपर्यंत तू थकला नव्हतास का?  असं करणने विचारल्यावर, रणवीरनं नकारार्थी मान हलवली. नाही, मी फक्त जरा जास्त बिझी होतो, असं तो म्हणाला.

 दीपिका व आलियामधील फरक
दीपिका व आलियामध्ये काय फरक आहे, असा प्रश्न रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने रणवीरला केला. यावर आलियाकडे भाषा प्राविण्य आहे आणि दीपिकाकडे उत्तम शारिरीक वैशिष्ट्य आहेत, असं रणवीर म्हणाला. हाच प्रश्न आलियाला केला गेला. रणवीर व रणबीरमध्ये काय फरक आहे, असं तिला विचारलं गेलं. यावर रणवीरकडे प्रत्येक भाषा बोलण्याची क्षमता आहे आणि रणबीर हा वेळ पाळणारा व्यक्ती आहे, असं उत्तर आलियाने दिलं.

 या एपिसोडमध्ये रणवीर सिंगने हृतिक रोशन, धर्मेन्द्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची हुबेहूब नक्कल केली. ती पाहून आलिया आणि करण जोहर दोघंही हैराण झाले.

 

Web Title: Koffee with Karan 7 Ranveer Singh reveals had sex in vanity Karan Johar shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.