Koffee With Karan 8: या गोष्टीवरुन भांडतात आलिया-रणबीर, करीना कपूरने वहिनीला दिला दुसऱ्या बाळासाठी सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 16:35 IST2023-11-14T16:35:20+5:302023-11-14T16:35:58+5:30
Koffee With Karan 8:आलिया भट आणि करीना कपूर खानने नुकतीच 'कॉफी विथ करण ८' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या दोघींनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

Koffee With Karan 8: या गोष्टीवरुन भांडतात आलिया-रणबीर, करीना कपूरने वहिनीला दिला दुसऱ्या बाळासाठी सल्ला
दरवर्षीप्रमाणे यंदाही करण जोहरचा सुपरहिट टॉक शो 'कॉफी विथ करण सीझन ८' चर्चेत आहे. शोच्या पुढच्या भागात, करणच्या दोन खास पाहुण्या करीना कपूर खान आणि आलिया भट त्याच्यासोबत कॉफी घेणार आहेत. या आगामी एपिसोडची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच करण जोहरने एपिसोडचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध नणंद-वहिनी जोडी करणच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसणार आहेत.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरसोबत झालेल्या संभाषणात आलिया भटने सांगितले की राहावरुन तिच्या आणि रणबीर कपूरमध्ये खूप भांडण होतात. ती म्हणाली, 'घरी रणबीर आणि माझ्यात राहावरुन भांडण होत आहे. आम्हा दोघांनाही आमच्या मुलीसोबत वेळ घालवायला खूप आवडते, पण तिच्यासोबत जास्त वेळ कोण घालवायचा यावरून आमच्यात भांडण होते.
करीना कपूरने वहिनीला दिला हा सल्ला
आलिया पुढे म्हणते की, 'ती खूप दिवसांपासून तुझ्यासोबत आहे, आता ते मला दे...' आलियाचे हे शब्द ऐकून करीना तिच्या वहिनीला सल्ला देते. ती आलियाला सांगते की हे दुसरे मूल होण्याचे लक्षण आहे, जेणेकरून दोघांकडे एक एक बाळ असेल.