"मी श्रीदेवीच्या प्रेमात होतो", करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 12:23 PM2024-01-03T12:23:22+5:302024-01-03T12:24:06+5:30

'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरने श्रीदेवी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

koffee with karan 8 karan johar said he is madly in love with sridevi recalled his first meet with her | "मी श्रीदेवीच्या प्रेमात होतो", करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..."

"मी श्रीदेवीच्या प्रेमात होतो", करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..."

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' या शोमुळे चर्चेत आहे. करण या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची पोलखोल करताना दिसतो. आधीच्या सीझनप्रमाणे करणच्या 'कॉफी विथ करणच्या ८'व्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या आगामी भागात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर सहभागी होणार आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरनेश्रीदेवी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तुझ्या आईच्या प्रेमात होतो, असा खुलासा करणने जान्हवीसमोर केला. तो म्हणाला, "मी तुझ्या आईच्या प्रेमात होतो. मी याआधीही हे अनेकवेळा बोललो आहे. मी तिचा मोठा चाहता होतो. आपण सगळे वेगळ्या टेक्नोलॉजीबरोबर मोठे झाले आहोत. त्यामुळे माझ्यासाठी थिएटर हीच व्हिडिओ फेज होती. मी राहत असलेल्या भागातील फारसे लोक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत नव्हते.  त्याकाळी तुझी आई आणि जितू जी सिनेमांत काम करायचे. त्यांचे सगळे चित्रपट मी पाहिले आहेत." 

"मिस्टर इंडिया सिनेमाच्या प्रिमिअरवेळी मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. १९९३मध्ये मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांच्या गुमराह या सिनेमात काम केलं होतं. सिनेमासाठी होणाऱ्या फोटोशूटच्या इथे मी गेलो होतो. तेव्हा माझे पाय थरथरत होते. माझ्या वडिलांनी त्यांना माझी ओळख करून दिली. पण, त्यावेळी काय बोलायचं हे मला सुचतच नव्हतं," असंही करणने पुढे सांगितलं. 

Web Title: koffee with karan 8 karan johar said he is madly in love with sridevi recalled his first meet with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.