अमिषा पटेलबरोबरच्या वादावर पहिल्यांदाच बोलली करीना कपूर, आलिया भटसोबत Koffee With Karan मध्ये लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 09:36 IST2023-11-13T09:29:52+5:302023-11-13T09:36:18+5:30
'कहो ना प्यार'च्या वेळेपासून करीना आणि अमिषा पटेल यांच्यात वाद आहे.

अमिषा पटेलबरोबरच्या वादावर पहिल्यांदाच बोलली करीना कपूर, आलिया भटसोबत Koffee With Karan मध्ये लावली हजेरी
करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण'चा ८वा सीझन सुरू झाला आहे. आतापर्यंत या शोचे तीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हे तीन एपिसोड चर्चेत राहिले आणि लोकांना ते आवडले. आता लवकरच चौथ एपिसोड ऑनएअर होणार आहे. यात ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर वहिनी आलिया भटसोबत यांची जोडी दिसणार आहे. याचा प्रोमोही आऊट झाला आहे.
प्रोमोमध्ये आलिया भट आणि करीना कपूर करण जोहरसोबत गॉसिप करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये करण जोहरने करीनाला 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीला उपस्थित न राहण्यामागचं कारण विचारतो आहे. तसेच अमिषा पटेलसोबत तिचं असलेल्या भांडणावरुन छेडताना दिसतोय. प्रोमोमध्ये दोन्ही अभिनेत्री करण जोहरच्या शोमध्ये बसलेल्या दिसत आहेत. या शोमध्ये करीना आणि आलिया करण जोहरच्या शोला वादग्रस्त म्हणताना दिसत आहेत.
करीनाने विचारले की, अमिषा पटेलसोबतचा तिचा इतिहास काय आहे? तेव्हा करण जोहर सांगतो की करीना 'कहो ना प्यार है' करणार होती, पण नंतर अमिषाने तो केला. हे ऐकून करीना आपला चेहरा दुसरीकडे वळवते आणि म्हणते, 'मी करणला इग्नोर मारते आहे, जसे तुम्ही सर्व पाहू शकता.
काय होता करीना आणि अमिषामधला वाद?
'कहो ना प्यार'च्या वेळेपासून करीना आणि अमिषा पटेल यांच्यात वाद आहे. आमिषा आधी करिनाला या चित्रपटात साईन करण्यात आले होते. तिने काही सीन्सचं शूटिंगही केले होते. पण नंतर काही कारणास्तव तिने हा चित्रपट सोडला, त्यानंतर अमिषा पटेलने 'कहो ना प्यार है'मधून डेब्यू केला. या चित्रपटात अमीषाची हृतिक रोशनसोबतची जोडी खूप आवडली होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही नावही नोंदवलं.