Koffee With Karan इज बॅक? किंग खान असेल पहिला पाहुणा; साऊथ कलाकारांनाही असेल आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:23 PM2023-03-31T12:23:17+5:302023-03-31T12:25:14+5:30

'कॉफी विद करण' च्या ७ व्या सिझनमध्ये शाहरुख खान आला नाही.

koffee with karan 8 shahrukh khan will we first guest south stars can also be seen | Koffee With Karan इज बॅक? किंग खान असेल पहिला पाहुणा; साऊथ कलाकारांनाही असेल आमंत्रण

Koffee With Karan इज बॅक? किंग खान असेल पहिला पाहुणा; साऊथ कलाकारांनाही असेल आमंत्रण

googlenewsNext

दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) चर्चेतला शो 'कॉफी विद करण' (Koffee With Karan) चा 8 वा सिझन येणार आहे. या शो मध्ये करण जोहर सेलिब्रिटींना बोलावून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करतो. या शो ची कायमच चर्चा होत असते. आता आठव्या सिझनची सुरुवात करणचा खास मित्र शाहरुख खानपासून (Shahrukh Khan) होणार असल्याचं कळतंय. माध्यम रिपोर्टनुसार, ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये एपिसोड रिलीज होणार आहे. मेकर्स सध्या तारखांची जुळवाजुळव करत आहेत.

सेलिब्रिटी टॉक शो 'कॉफी विद करण' बरेचदा वादातही अडकला आहे. स्वत: अनेक दिग्गज सेलिब्रिटींनीच या शो ची खिल्ली उडवली आहे.  तर अनेकांनी शो मध्येच येणंच टाळलं आहे. करण जोहर मात्र सेलिब्रिटींना शो वर बोलवून 'गॉसिप' करतो. चाहतेही अगदी उत्सुकतेने शो फॉलो करतात.

शाहरुख खान पहिला पाहुणा

'कॉफी विद करण' च्या ७ व्या सिझनमध्ये शाहरुख खान आला नाही. आता 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खान करणच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. करणच्या शोमध्ये शाहरुख येणार म्हणल्यावर शाहरुखचे चाहतेही खूश झालेत. 

रिपोर्टनुसार, या नवीन सीझनमध्ये साऊथचे कलाकारही दिसण्याची शक्यता आहे. साऊथ कलाकारांचा सध्या दबदबा आहे याची दखल करणनेही घेतल्याचं दिसतंय. यश, अल्लू अर्जुन, ऋषभ शेट्टी सारखे कलाकार शोमध्ये एंट्री घेऊ शकतात. 

Web Title: koffee with karan 8 shahrukh khan will we first guest south stars can also be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.