Koffee With Karan 8: "माझ्या वडिलांना जे हवंय... ", धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया, बॉबीला आलं हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:05 PM2023-10-30T14:05:53+5:302023-10-30T14:06:21+5:30

Koffee With Karan 8: देओल ब्रदर्स यावेळी करण जोहरचे पाहुणे असतील. कॉफी विथ करण ८ शोचा प्रोमोही आला आहे. ज्यामध्ये करण जोहर बॉबी देओल आणि सनी देओलसोबत चॅट करताना दिसत आहे.

Koffee With Karan 8: 'What my father wants...', Sunny Deol reacts to Dharmendra's kissing scene, Bobby laughs | Koffee With Karan 8: "माझ्या वडिलांना जे हवंय... ", धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया, बॉबीला आलं हसू

Koffee With Karan 8: "माझ्या वडिलांना जे हवंय... ", धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया, बॉबीला आलं हसू

देओल ब्रदर्स यावेळी करण जोहरचे पाहुणे असतील. कॉफी विथ करण ८ (Koffee With Karan 8) शोचा प्रोमोही आला आहे. ज्यामध्ये करण जोहर (Karan Johar) बॉबी देओल (Bobby Deol) आणि सनी देओल(Sunny Deol)सोबत चॅट करताना दिसत आहे. या संभाषणात करण जोहरने देओल ब्रदर्सच्या यशाबद्दल स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि धर्मेंद्र यांच्या लिप किसवर प्रतिक्रियाही दिली. हा प्रोमो समोर येताच व्हायरल होताना दिसत आहे.

या प्रोमोमध्ये पाहायला मिळेल की करण जोहर सनी देओलसोबत ऑर्गेनिक कलेक्शनबद्दल बोलत होता. यादरम्यान करणने विचारले की, मी पाहिले की गदरच्या कलेक्शनबद्दल तुम्ही कसे म्हणालात की हे आमचे ऑर्गेनिक कलेक्शन आहे, मग ते आमचे नाही का? या प्रश्नाचे उत्तर देताना सनी आधी हसायला लागला. यानंतर तो म्हणाला की, 'तसं नाहीये, पण आजकाल सगळेच तेच करतात, म्हणजे झालं...'

तू खूप चालाख आहेस...
या प्रोमोमध्ये बॉबी देओल एक मजेशीर किस्सा सांगताना दिसला. बॉबी म्हणाला, 'एक दिवस मी सलमानशी बोलत होतो. तो म्हणाला एकदा माझे करिअर चांगले चालत नव्हते तेव्हा मी तुझ्या भावाच्या पाठीवर चढलो होतो आणि पुढे गेले. त्यावेळी मी सलमानला म्हणालो की, मामू मला तुमच्या पाठीवर चढू द्या. हे ऐकून करण बॉबीला चालाख म्हणाला.

प्रतिक्रिया काय होती?
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमीचा किसिंग सीन होता. या सीनमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण आता देओल बंधूंनी या किसिंग सीनवर मौन तोडले आहे. बॉबी म्हणाला- 'आम्ही विनोद करत राहतो की पापा ज्या प्रकारे किस करत आहेत ते बघा. पण ते खूप क्युट दिसत होते. यानंतर सनी म्हणाला की, 'माझे वडील त्यांना हवे ते करू शकतात आणि ते केल्यावर ते त्यातून दूर जातात... हे सांगून सनी हसायला लागला.
 

Web Title: Koffee With Karan 8: 'What my father wants...', Sunny Deol reacts to Dharmendra's kissing scene, Bobby laughs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.