अंलक्रिता श्रीवास्तवच्या आगामी सिनेमात कोंकणा सेन शर्मा व भूमी पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 08:00 IST2018-10-12T16:53:27+5:302018-10-15T08:00:00+5:30
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटाची दिग्दर्शिका अलंक्रिता श्रीवास्तव एकता कपूरसोबत आणखीन एक महिला केंद्रीत चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

अंलक्रिता श्रीवास्तवच्या आगामी सिनेमात कोंकणा सेन शर्मा व भूमी पेडणेकर
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटाची दिग्दर्शिका अलंक्रिता श्रीवास्तव एकता कपूरसोबत आणखीन एक महिला केंद्रीत चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा सुरू होती. आता सूत्रांकडून समजते आहे की या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेत्री भूमी पेडणेकर व कोंकणा सेन यांची या सिनेमासाठी निवड केली आहे. भूमी व कोंकणा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाशी निगडीत सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाची कथा दोन महिलांवर आधारीत असून त्या ग्रेटर नोएडामध्ये सेटल आहेत. जेव्हा अलंक्रिताने भूमी व कोंकणा या दोघींना स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा त्या दोघींना खूप आवडली आणि त्यांनी या सिनेमात काम करण्यास होकार दिला. भूमी पेडणेकर व कोंकणा सेन या दोघीही या सिनेमाच्या तयारीला लागल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात त्या दोघी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहेत. अद्याप या सिनेमाचे शीर्षक समजू शकलेले नाही.
यापूर्वी कोंकणा सेनने अलंक्रिता श्रीवास्तवच्या लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमात काम केले आहे. आता या सिनेमातून पुन्हा एकदा अलंक्रिता व कोंकणा एकत्र काम करणार आहेत.
अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकतेच आगामी चित्रपट 'सोन चिरैया'चे चित्रीकरण पूर्ण केले असून या सिनेमात ती सुशांत सिंग राजपूतसोबत झळकणार आहे. कोंकणा सेन व भूमी पेडणेकर या दोघीदेखील या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.