Video: BTS च्या Jungkook ने धरला 'नाटू नाटू'वर ताल; द. कोरियातही होतीये RRR ची हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 19:22 IST2023-03-05T19:21:15+5:302023-03-05T19:22:15+5:30
Jungkook: सध्या सोशल मीडियावर Jungkookचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क RRR चं 'नाटू नाटू' गाणं गुणगुणताना दिसत आहे.

Video: BTS च्या Jungkook ने धरला 'नाटू नाटू'वर ताल; द. कोरियातही होतीये RRR ची हवा
प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने संपूर्ण जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. त्यातही या चित्रपटातील 'नाटू नाटू' (naatu-naatu) हे गाणं तर तुफान व्हायरल झालं आहे. जगभरातून या गाण्याला पसंती मिळत असताना आता प्रसिद्ध कोरियन म्युझिक बँड बीटीएस (BTS) यालाही नाटू नाटूची भूरळ पडली आहे. या बँडमधील सर्वाधिक लोकप्रिय तरुण सदस्य असणाऱ्या जंगकूकचा (Jungkook) या गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर Jungkookचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क RRR चं 'नाटू नाटू' गाणं गुणगुणताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्याने या गाण्यावर चक्क तालही धरला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते कमालीचे खूश झाले आहे. सध्या जंगकुकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
BTSच्या जंगकूकने इन्स्टाग्रामला केलं रामराम; खरं कारण आलं समोर
JUNGKOOK VIBING TO NATTU NATTU YOU ARE KIDDING ME?)?&)&/?&/pic.twitter.com/174PE8vK4w
— MY LOVE ◡̈ (@vanteguggie) March 3, 2023
दरम्यान, BTS हा एक दक्षिण कोरियाई (Republic of Korea) म्युझिकल बॉय बँड ग्रुप असून यातील जंगकूकची तरुणांमध्ये विशेष क्रेझ आहे. तर, एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला 95 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.