टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफच्या ‘एक्स’ने ‘एक्स’साठी लिहिली पोस्ट; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 03:14 PM2021-02-17T15:14:01+5:302021-02-17T15:15:13+5:30
कृष्णाचा ‘एक्स’ एबनने ‘एक्स’साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत असते. नुकतेच कृष्णाचे ब्रेकअप झालेय. होय, अलीकडे कृष्णा व तिचा बॉयफ्रेन्ड एबन हेम्स यांचे नाते संपुष्टात आले आहे. अशात कृष्णाचा ‘एक्स’ एबनने ‘एक्स’साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
‘एबन’ने त्याच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘ जेव्हा तू एक्ससोबत इतके वाईट केले असताना, माझ्यासाठी इतकी वेडी बनू नकोस. माझ्याबद्दल खूप बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. वेडी व्हायचे नसेल तर वेडीच राहा,’ असे त्याने लिहिले आहे.
यापूर्वी एबनने एक्सबद्दल बोलणा-या लोकांसाठी पोस्ट शेअर केली होती. ‘तुम्ही तुमच्या एक्स पार्टनरसोबत नातं तोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमचा एक्स तुमच्याबद्दल वाईट विचार करणार, बोलणार. जेणेकरून त्याला बरे वाटावे. पण यातून काहीही साध्य होणार नाही. ऊलट तुम्ही आणखी आतल्या आत आणखी दु:खी व्हाल. तेव्हा असे काहीही करू नका. एक्सबद्दल वाईट बोलण्याऐवजी त्याचा मित्र बनून सोबत राहण्याचा प्रयत्न करा,’ असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते.
कृष्णा व एबन दोघेही सुमारे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या काळात दोघांचेही रोमॅन्टिक फोटो खूप व्हायरल झाले होते. लॉकडाऊनदरम्यानही दोघे एकत्र राहिले होते. आता मात्र दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. का, हे माहित नाही. मात्र कृष्णाने स्वत: याबद्दल एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. सोबत स्वत:च्या इन्स्टाग्रामवरचे एबनसोबतचे सर्व फोटोही डिलीट केले होते.
एबन हा एक ऑस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे. एका मुलाखतीत कृष्णाने तिच्या आयुष्यात एक व्यक्ती असल्याची कबुली दिली होती. मी ज्याच्यासोबत आहे, आनंदी आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर एबनसोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.
25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.