बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झाला टायफॉईड, स्वत:च शेअर केलं हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:29 IST2025-01-27T10:25:46+5:302025-01-27T10:29:56+5:30

अभिनेत्रीला टायफॉईडची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे चाहते काळजीत आहेत. 

Kriti Kharbanda Diagnosed Typhoid Actress Shared Health Update On Instagram Story | बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झाला टायफॉईड, स्वत:च शेअर केलं हेल्थ अपडेट

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झाला टायफॉईड, स्वत:च शेअर केलं हेल्थ अपडेट

Kriti Kharbanda Diagnosed Typhoid: बॉलिवूड अभिनेता कृती खरबंदाच्या आयुष्यात सध्या काही आलबेल दिसत नाही. एकीकडे व्यावसायिक आयुष्यात ती फारशी चमकदार कामगिरी करत नसताना वैयक्तिक आयुष्यातही आजारपणाला सामोरं जावं लागत आहे. कृती खरबंदाला टायफॉईडची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे चाहते काळजीत आहेत. 

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांसोबत आजाराबद्दल अपडेट दिलं. तिनं लिहलं, "सर्वांना नमस्कार. आयुष्याबद्दल एक छोटीशी अपडेट.... गेल्या आठवड्यापासून मला टायफॉइडचा त्रास आहे आणि येत्या काही दिवसांत मी बरी होण्याची आशा करते.  तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असुद्या. जेणेकरून मला लवकर बरं होण्यात मदत होईल". या पोस्टनंतर चाहते अभिनेत्री लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

कृती खरबंदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'हाऊसफुल ४', 'गेस्ट इन लंडन', 'शादी में जरूर आना' सारखे अनेक चित्रपट केले आहेत. कृती ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठी अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत राहते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षी पुलकित सम्राटशी तिनं लग्न केलं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, दोघांनी जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात केली. 

Web Title: Kriti Kharbanda Diagnosed Typhoid Actress Shared Health Update On Instagram Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.