क्रिती सॅनन करणार 'ह्या' सिनेमात आयटम साँग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 03:31 PM2018-08-11T15:31:58+5:302018-08-13T07:15:00+5:30

अभिनेत्री क्रिती सॅनन 'आओ कभी हवेली पे...' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

Kriti Sanan will do an item song in 'This' movie | क्रिती सॅनन करणार 'ह्या' सिनेमात आयटम साँग

क्रिती सॅनन करणार 'ह्या' सिनेमात आयटम साँग

googlenewsNext
ठळक मुद्दे'स्त्री' आहे हॉरर कॉमेडी चित्रपट क्रिती करणार पहिल्यांदाच आयटम नंबर

अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट 'स्त्री'मध्ये अभिनेत्री नोरा फतेही कमरिया या गाण्यावर डान्स करताना पाहिले होते. त्यानंतर आता समजते आहे की आणखीन एक अभिनेत्री पहिल्यांदा आयटम साँग करताना दिसणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे क्रिती सॅनन.


डीएनएच्या रिपोर्टनुसार क्रिती सॅनन 'स्त्री' सिनेमातील आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे. हे गाणे सचिन -जिगर संगीतबद्ध करणार आहेत. 'आओ कभी हवेली पे...' असे या गाण्याचे बोल आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते राज निधिमोरू आणि कृष्णा डीके यांना हे गाणे चित्रपटात मनोरंजक ठरेल, असे वाटले. या गाण्याला रॅप बादशाह देणार आहेत. 
क्रिती पहिल्यांदाच आयटम साँग करताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरणही नुकतेच पार पडले. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्री चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक आठवडा आधी निर्माते हे गाणे प्रदर्शित करणार आहेत. हे गाणे प्रमोशनल साँग म्हणून वापरण्यात येणार आहे. या गाण्यात क्रितीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे आणि या गाण्यात तिच्यासोबत राजकुमार राव दिसणार आहे. 
'स्त्री' चित्रपट हॉरर कॉमेडी असून राजकुमार राव व श्रद्धा कपूर यांच्याव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, विजय राज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रद्धा पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग भोपाळ, मध्यप्रदेशच्या जवळपासचे चंदेरी या ठिकाणी झाले आहे. हा चित्रपट ३१ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Kriti Sanan will do an item song in 'This' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.