"वो योद्धा मरेगा नहीं सिर्फ मारेगा...", क्रिती सनॉन आणि टायगर श्रॉफच्या 'गणपत'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:59 PM2023-10-09T16:59:47+5:302023-10-09T17:00:19+5:30

Ganpath Trailer: टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉनचा आगामी चित्रपट गणपतचा ट्रेलर रिलीज झाला आहे. २ मिनिटे ३० सेकंदांचा हा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे.

Kriti Sanon and Tiger Shroff's 'Ganpat' trailer released | "वो योद्धा मरेगा नहीं सिर्फ मारेगा...", क्रिती सनॉन आणि टायगर श्रॉफच्या 'गणपत'चा ट्रेलर रिलीज

"वो योद्धा मरेगा नहीं सिर्फ मारेगा...", क्रिती सनॉन आणि टायगर श्रॉफच्या 'गणपत'चा ट्रेलर रिलीज

googlenewsNext

'एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो अमर होगा, वो अमीरों और गरीबों के बीच की दीवार गिराएगा...वो योद्धा मरेगा नहीं मारेगा'.  या दमदार डायलॉगने टायगर श्रॉफ(Tiger Shroff)च्या 'गणपत' (Ganpat Movie) चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon)चा आगामी चित्रपट 'गणपत'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. २ मिनिटे ३० सेकंदांचा हा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. यात एक प्रेमकथा आणि भरपूर अॅक्शनही आहे. मनोरंजनाची पातळी दुप्पट करण्यासाठी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan)ही चित्रपटात दिसत आहेत.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, क्रिती सनॉन टायगरचा जीव वाचवते आणि त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते. तो दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीला प्रपोज करतो. ज्यावर क्रिती म्हणते की, आपण फक्त एक दिवस आधी भेटलो होतो. त्यावर टायगर म्हणतो की, प्रेमात पडायला किती वेळ लागतो. मग त्यांच्यातील जवळीक वाढते. तर अमिताभ बच्चन पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहेत. पगडी आणि चष्मा घालून आणि एक डोळा झाकूलेल्या अवतारात ते दिसत आहेत आणि म्हणत आहेत की, श्रीमंतांना आमच्या खेळाची हिंट मिळाली आहे. त्या सैतानासाठी पैसाच सर्वकाही आहे. 

ट्रेलरमध्ये, काही गुंड क्रिती आणि टायगरला वेगळे करतात. ते टायगरला बेदम मारहाण करतात आणि सोबत घेऊन जातात. तोपर्यंत टायगर गुड्डू राहतो. पण दुसऱ्या हाफनंतर तो गणपतच्या रुपात परततो. तेव्हापासून गुड्डूचा अध्याय संपतो आणि गणपतचा अध्याय सुरू होतो. यानंतर क्रिती सनॉनही फुल अॅक्शनमध्ये दिसत आहे. 'ब्रह्मास्त्र'ची आठवण करून देणाऱ्या या सिनेमात व्हीएफएक्सचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.

या चित्रपटांचा 'गणपत'शी होणार सामना

'हीरोपंती'नंतर क्रिती सनॉन आणि टायगर श्रॉफची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या दिवशी आणखी तीन चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये कंगना राणौतचा 'तेजस', दिव्या खोसलाचा 'यारियाँ २' आणि तिसरा 'प्यार है तो है' प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Kriti Sanon and Tiger Shroff's 'Ganpat' trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.