'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 03:11 PM2022-03-09T15:11:26+5:302022-03-09T15:12:17+5:30

Ankita lokhande: अभिनेत्री क्रिती सेनॉनला पाहून अंकिता तिला बोलावते आणि गप्पा मारायचा प्रयत्न करते. मात्र, क्रिती अगदी जुजबी बोलून तिला इग्नोर करते.

kriti sanon ignores ankita lokhande on meeting watch video viral | 'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर

'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर

googlenewsNext

'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) सध्या सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. अंकिता अनेकदा इन्स्टाग्रामवर पती विकी जैनसोबतचे काही मजेशीर व्हिडीओ वा तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंतीही मिळते. मात्र, सध्या ती अशाच एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनला)  (kriti sanon पाहून अंकिता तिला बोलावते आणि गप्पा मारायचा प्रयत्न करते. मात्र, क्रिती अगदी जुजबी बोलून तिला इग्नोर करते. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे. ती तुझ्याकडे साधं पाहातही नाहीये, असं म्हणत नेटकऱ्यांची तिची खिल्ली उडवली आहे.

"अरे ती क्रिती तुझ्याकडे पाहातही नाहीये, असं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर, क्रितीला बोलण्यात काहीही रस नाहीये. तरी पण अंकिता उगाच बोलायचा प्रयत्न करते", अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी क्रिती सेनॉनही चर्चेत आली होती. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.
 

Web Title: kriti sanon ignores ankita lokhande on meeting watch video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.