Kriti Sanon 'बाहुबली' फेम अभिनेत्याला करतेय डेट?, याबाबत वरुण धवनचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:37 AM2022-11-29T10:37:38+5:302022-11-29T10:38:16+5:30

Kriti Sanon : क्रिती सनॉन कोणत्याही बॉलिवूड स्टारला नाही तर साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याची सध्या चर्चा रंगली आहे.

Kriti Sanon is dating 'Baahubali' fame actor?, Varun Dhawan's big revelation | Kriti Sanon 'बाहुबली' फेम अभिनेत्याला करतेय डेट?, याबाबत वरुण धवनचा मोठा खुलासा

Kriti Sanon 'बाहुबली' फेम अभिनेत्याला करतेय डेट?, याबाबत वरुण धवनचा मोठा खुलासा

googlenewsNext

क्रिती सनॉन (Kriti Sanon) बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपले आयुष्य खूप खाजगी ठेवते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाला किती भेटते हे फार कमी लोकांना माहिती आहे. मात्र, आता बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने क्रिती सनॉनच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्यानंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की, क्रिती सनॉन कोणत्याही बॉलिवूड स्टारला नाही तर साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas)ला डेट करते आहे.

वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सनॉन सध्या त्यांच्या 'भेडिया' (Bhediya Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हे दोन्ही कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन आणि क्रिती सनॉन चित्रपट निर्माता करण जोहरच्या रिएलिटी शो झलक दिखला जा १० मध्ये गेले होते. या शोमध्ये करण जोहरने या दोघांसोबत खूप धमाल केली. यादरम्यान वरुण धवनने क्रिती सनॉनच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

झलक दिखला जा १०च्या सेटवर वरुण धवनला करण जोहरने विचारले की त्याच्या आयुष्यात क्रिती सनॉनचे नाव का नाही? यावर अभिनेता म्हणाला, क्रितीचे नाव नव्हते कारण क्रितीचे नाव कुणाच्या तरी हृदयात आहे. एक माणूस आहे जो मुंबईत नाही, तो सध्या दीपिका पदुकोणसोबत शूटिंग करतो आहे. वरुण धवनचे हे म्हणणे ऐकून क्रिती सनॉन लाजली आणि हसायला लागली.  प्रभासच्या चाहत्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या प्रभास मुंबईबाहेर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत प्रोजेक्ट के या चित्रपटाची शूटिंग करतो आहे. क्रिती सनॉन प्रभासला डेट करत असल्याची चर्चा आहे. प्रभास आणि क्रिती लवकरच आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास रामची भूमिका साकारत आहे, तर क्रिती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Kriti Sanon is dating 'Baahubali' fame actor?, Varun Dhawan's big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.