क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बूच्या 'द क्रू'च्या शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:42 PM2023-03-29T20:42:50+5:302023-03-29T20:43:09+5:30

क्रितीनं स्वत:च 'द क्रू'च्या क्लॅप बोर्डचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून याबाबतची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

Kriti Sanon, Kareena Kapoor and Tabu's 'The Crew' begins shooting | क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बूच्या 'द क्रू'च्या शूटिंगला सुरूवात

क्रिती सनॉन, करीना कपूर आणि तब्बूच्या 'द क्रू'च्या शूटिंगला सुरूवात

googlenewsNext

'परम सुंदरी...' आणि 'ठुमकेश्वरी...'सारखी एका मागोमाग एक हिट गाणी देणारी हिंदी सिनेसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री क्रिती सनॉन आणखी एका नव्या चित्रपटामुळं लाईमलाईटमध्ये आली आहे. 'द क्रू' असं टायटल असलेल्या क्रितीच्या आगामी हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात क्रितीसोबत करीना कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने क्रिती-करीना एकत्र आल्या असून त्यांच्या जोडीला तबूही असणार आहे.

क्रितीनं स्वत:च 'द क्रू'च्या क्लॅप बोर्डचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून याबाबतची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. एक नवीन सुरुवात!!! यासाठी खूपच उत्साही आहे! नवीन स्टोरी आणि नव्या कॅरेक्टरचं फिलींग... हा प्रवास निश्चितच अविस्मरणीय ठरेल! असे कॅप्शन क्रितीने दिले आहे. क्रितीची ही पोस्ट पाहून चाहते या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहेत.

'द क्रू' या चित्रपटाची कथा तीन स्त्रियांवर आधारलेली आहे. क्रितीसोबत 'द क्रू'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, करीना आणि तबू अद्याप जॅाईन झालेल्या नाहीत. रिया कपूर आणि एकता कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णन करत आहेत. तर या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अनुज धवन करत आहेत. या चित्रपटात क्रिती, करीना आणि तब्बू या तिघींना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Kriti Sanon, Kareena Kapoor and Tabu's 'The Crew' begins shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.