Kriti Sanon Video : आप का पार्टनर नहीं हैं? हा प्रश्न ऐकताच क्रिती सॅनाननं वळून मागे पाहिलं; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:58 PM2022-11-17T15:58:26+5:302022-11-17T15:59:04+5:30
Kriti Sanon : क्रितीनं काल एका अवार्ड शोमध्ये हजेरी लावली. थाई-हाय ब्ल्यू स्लिट ड्रेसमध्ये क्रितीनं झक्कास एन्ट्री घेतली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या...
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon ) सध्या ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या 25 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. याचदरम्यान काल क्रितीनं एका अवार्ड शोमध्ये हजेरी लावली. थाई-हाय ब्ल्यू स्लिट ड्रेसमध्ये क्रितीनं झक्कास एन्ट्री घेतली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. क्रिती पोझ देण्यासाठी उभी राहिली, याचदरम्यान पापाराझींनी तिला असा काही प्रश्न केला की, क्षणभर ती सुद्धा गोंधळली.
कॅमेऱ्याला पोझ दिल्यानंतर क्रिती अवार्ड फंक्शनसाठी रवाना होणार, तितक्यात ‘आपका पार्टनर नहीं है?’, असा प्रश्न एका फोटोग्राफरने केला. फोटोग्राफरचा हा प्रश्न ऐकून क्रिती अवाक् झाली. तिने मागे वळून बघितलं आणि तो क्या हुआ? असं म्हणत हसत हसत ती आत निघून गेली. या क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
गेल्या काही दिवसांपासून क्रितीचं नाव साऊथ सुपरस्टार प्रभासशी जोडलं जात आहे. बॉलिवूडची मोस्ट गॉर्जिअस अॅक्ट्रेस क्रिती सॅनन प्रभासला डेट करत असल्याची चर्चा आहे.
क्रिती व प्रभासच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या त्या ‘कॉफी विद करण 7 ’ या शोनंतर. या शोमध्ये अलीकडे क्रिती सहभागी झाली होती. कॉलिंग सेगमेंट राऊंडमध्ये क्रितीने प्रभासला फोन केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये स्पेशल बॉन्ड असल्याचं समोर आलं होतं. आता क्रिती व प्रभास यांच्यात रोमॅन्टिक रिलेशनशिप असल्याचं म्हटलं जात आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांत चांगली मैत्री झाली आणि आता दोघांचं नातं मैत्रीपेक्षा पुढे गेल्याचं मानलं जात आहे. प्रभास कमालीचा लाजरा आहे. पण सेटवरच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, क्रितीसोबत तो अगदीच मनमोकळा बोलतो, वावरतो. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये काहीतरी शिजतेय, अशी चर्चा त्यामुळेच सुरू झाली. अर्थात सध्यातरी दोघांच्या नात्याबद्दल काही म्हणणं घाईघाईचं ठरेल.