क्रिती सनॉन हिचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली, '१० वर्षात एकही हिट चित्रपट देऊ न शकलेला हिरो...‘

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:26 PM2024-05-12T12:26:28+5:302024-05-12T12:30:23+5:30

अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

Kriti Sanon talks about the rising overhead cost of actors asks why male co-stars get paid 10 times more 'for no reason' | क्रिती सनॉन हिचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली, '१० वर्षात एकही हिट चित्रपट देऊ न शकलेला हिरो...‘

क्रिती सनॉन हिचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली, '१० वर्षात एकही हिट चित्रपट देऊ न शकलेला हिरो...‘

बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सनॉन. एवढंच नाही तर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  क्रिती सनॉन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे.  आता देखील अभिनेत्री बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी क्रिती सनॉननं बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या मानधनावर भाष्य केलं. अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने नुकतेच 'फिल्म कॅम्पिनियन'ला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडबद्दल मांडलं रोखठोक मत मांडलं. अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा १० पट जास्त मानधन का मिळतं ? यावर क्रिती सेनन म्हणाली, "आजही अभिनेत्यांमध्ये आणि अभिनेत्रींमध्ये मानधनाच्या बाबतीत खूप मोठी तफावत आहे. ज्या अभिनेत्याने गेल्या १० वर्षांत एकही हिट चित्रपट देता आला नाही, तरही त्याला १० पट जास्त फी मिळते. काहीही कारण नसताना हा ऐवढा मोठा फरक आहे'.

अभिनेत्यांना मिळणाऱ्या मानधनाला निर्मात्यांकडूनही समर्थन केलं जातं असल्याचं क्रितीनं सांगितलं. ती म्हणाली, 'अनेक वेळा निर्माते म्हणतात की ही रिकव्हरी आहे. रिकव्हरी ही डिजिटल आणि सॅटेलाइटद्वारे होते, जी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केली जाते. काहीही चूक होण्याआधी, डिजिटल आणि सॅटेलाइटमधून बजेट काढले जाते. कारण पुरूषकेंद्रित चित्रपट डिजिटल आणि सॅटेलाइटवर स्त्री चित्रपटांपेक्षा खूप चांगले परफॉर्मन्स करतात'. यासोबतच  'क्रू' हा स्त्री प्रधान चित्रपट असल्याने निर्माते जास्त पैसे इन्व्हेस्ट करणार नव्हते, असाही दावा क्रितीनं केला. 

क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच काजोल देवगनसोबत 'दो पत्ती' चित्रपटात दिसणार आहे. क्रिती या चित्रपटाची सहनिर्मातीही आहे. तर २०२४ मध्ये क्रिती सेनॉनने दोन हिट चित्रपट दिले. अलिकडेच क्रितीचा 'क्रू' चित्रपट प्रदर्शित झाला. हा एक स्त्री प्रधान चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. तर त्याआधी क्रितीचा  शाहिद कपूरसोबत 'तेरी बातों में उल्झा जिया' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.  या सिनेमानेही चांगला व्यवसाय केला होता. 
 

Web Title: Kriti Sanon talks about the rising overhead cost of actors asks why male co-stars get paid 10 times more 'for no reason'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.