"अनेक गौरवशाली क्षण...", क्रिती सेनॉनच्या आईनं मुलीसाठी लिहिली भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:02 PM2022-09-15T19:02:20+5:302022-09-15T19:11:59+5:30
फिल्मफेअरचा अॅवॉर्ड जिंकल्यानंतर कामातून ब्रेक घेत सध्या कुटुंबासोबत फ्रान्समध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
'हिरोपंती' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. उत्तम अभिनयाच्या जोरावर आज क्रिती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ती चर्चेत असते. अलिकडेच क्रितीचा मिमी चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा आनंद ती आपल्या कुटुंबासोबत साजरा करत आहे.
क्रितीच्या आईने सोशल मीडियावर आपल्या मुलीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. क्रितीची आई गीता यांनी लिहिले, ''आपण जरी शरिराने दूर असलो तरी हा आनंदाचा क्षण आपल्याला एकत्र साजरा करण्यापासून कुणी थांबवू शकतं नाही. मला खूप गर्व आहे की, तुला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा पुरस्कार मिळाला. असे अनेक गौरवशाली क्षण नक्कीच तुमच्या वाट्याला येतील. ''
सध्या क्रिती तिच्या कुटुंबासह फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याचा आनंद फ्रान्समध्ये साजरा करते आहे. कामातून ब्रेक घेत आहे ती तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह युरोपमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. या फोटोंमध्ये क्रिती सेनॉन मनीष मल्होत्रा, तिची बहीण नुपूर सेनन आणि आई गीता सेनन यांच्यासह अनेक लोकांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
क्रिती लवकरच झळणार नव्या चित्रपटात
मिमी चित्रपटाच्या यशानंतर क्रिती लवकरच काही नव्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यात 'आदिपुरुष', 'बच्चन पांडे', 'भेडिया', 'गणपत', 'हम दो हमारे दो' या चित्रपटांचा समावेश आहे.