Kriti Sanon : क्रिती सॅननने केली प्लास्टिक सर्जरी? व्हायरल होत आहेत Then and Now फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:23 IST2023-03-20T16:12:29+5:302023-03-20T16:23:48+5:30
Kriti Sanon : बॉलिवूडची परमसुंदरी अर्थात क्रिती सॅनन सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. क्रिती बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. पण आता क्रितीने सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केल्याची चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळतेय.

Kriti Sanon : क्रिती सॅननने केली प्लास्टिक सर्जरी? व्हायरल होत आहेत Then and Now फोटो
बॉलिवूडची परमसुंदरी अर्थात क्रिती सॅनन (Kriti Sanon) सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. क्रिती बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. पण आता क्रितीने सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केल्याची चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळतेय. क्रितीचे जुने आणि आत्ताचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावरून क्रितीनेही अनुष्का शर्मा व प्रियंका चोप्रा सारखी प्लास्टिक वा अन्य कॉस्मेटिक सर्जरी केल्याचा दावा काहीजण करत आहेत.
क्रितीच्या Then and Now फोटोत क्रितीचं नाक फारच वेगळं दिसत आहेत. जुन्या फोटोतील तिचं नाक आणि आत्ताच्या फोटोतील तिचं नाक यात बराच फरक आहे. यावरून तिनेही सुंदर दिसण्यासाठी नोझ जॉब केल्याचा दावा चाहते करत आहेत. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नक्कीच, क्रितीने सर्जश्री केलीये. पण अतिशय बारकाईने आणि उत्तम प्रकारे. कितीही निरखून बघितलं तरी तिच्या नाकातील फरक सहज लक्षात येत नाही, असं एका युजरने लिहिलं आहे. तिचं नाक आधीपेक्षा फारच सुंदर दिसतंय. खूपचं चांगलं काम केलं गेलं आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
काही युजर्सनी मात्र क्रितीने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा बकवास असल्याचं म्हटलं आहे. कॅमेरा ॲंगल व लाईटमुळे फोटोतील तिचा लुक वेगळा दिसतोय, असं काहींनी म्हटलं आहे. काहींनी वाढतं वय आणि व्यायाम यामुळे तिचा चेहरा बदलल्याचा निष्कर्ष काढला आहे. आता खरं काय, हे तर क्रितीलाच ठाऊक.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर क्रितीने २०१४ साली हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर बरेली की बर्फी. लुकाछुपी, हाऊसफुल ४, बच्चन पांडे, भेडिया अशा अनेक सिनेमांत ती झळकली. लवकरच ती आदिपुरूष व गणपत या सिनेमात दिसणार आहे.