कंगणा राणौतसह अभिनेत्याने घेतला पंगा, म्हणाला सेटिंगमुळेच मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:23 PM2021-06-19T18:23:32+5:302021-06-19T18:29:09+5:30
‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांचीही पसंती मिळवली. 'पंगा' आणि 'मणिकर्णिका' या सिनेमात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
आपल्या बिनधास्त आणि अनोख्या शैलीमुळे रसिकांबरोबरच समीक्षकांच्याही मनात स्थान मिळविलेल्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये कंगना राणौत गणली जाते. तिला पदार्पणातच ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांचीही पसंती मिळवली. 'पंगा' आणि 'मणिकर्णिका' या सिनेमात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतला एक वेळा नाही तर चार चार वेळा पुरस्कार मिळणारच ना, सगळे सेटिंग लावून तर मिळवले आहेत असे म्हणत कंगणासह थेट कमाल खानने पंगा घेतला आहे. नेहमीच केआरके कोणत्या कोणत्या कलाकांराची अशाच प्रकारे टर खेचत चर्चेत येत असतो. आता तर त्याने थेट कंगणावरच निशाणा साधला आहे. इतकेच बोलून तो थांबला नाही तर त्याने 12 वी नापास असलेली ही बाई इतरांचा द्वेष करण्यात पीएचडी आहे असं म्हणत केआरकेनं तिची चेष्टा केली आहे. केआरकेने केलेल्या अपमानावर कंगणा काय उत्तर देणार याकडेच सध्या लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर केआरकेने भला मोठा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो कंगणाची खिल्ली उडवताना दिसत आहे. कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणाचे निमित्त साधत त्याने कंगणावर निशाणा साधला. मला खूप पैसे कमावायचे आहेत. मला बॉलिवूडची क्वीन म्हणून सगळे ओळखतात तुम्ही माझा राग पाहिला नाही अजून असे बोलत तो कंगणाची टर उडवली आहे. केआरकेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सचेही लक्ष वेधून घेत आहे.
'देशद्रोह' प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाकडनं कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप घेतला आहे. 'धाकड' या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी कंगनाला 15 जून ते 30 ऑगस्ट हंगेरीला रवाना व्हायचं होतं. शूटिंग पूर्ण करण्यासाठी कंगनाला तातडीनं परदेशात जाणे गरजेचे असल्याचे तिनं कोर्टाला सांगितलं होते. या प्रकरणी पुढील सुनावणीमध्ये कंगणाला दिलासा मिळणार की नाही स्पष्ट होईल.