KRK पुन्हा बरळला, ट्विट करत म्हणाला - 'सलमान खानने ५० कोटींमध्ये दिली माझी सुपारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:53 PM2022-03-24T15:53:22+5:302022-03-24T16:01:55+5:30
KRK-Salman Khan : केआरकेने आता त्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्याने पुन्हा एकदा सलमान खानचं नाव घेतलं आहे. सलमान खानकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केआऱकेने केला आहे.
पुन्हा एकदा वायफळ बडबड करणारा आणि वादग्रस्त दावे करणारा, बॉलिवूडच्या काही स्टार्सना टार्गेट करणारा केआरके म्हणजे कमाल राशिद खान (KRK) पुन्हा एकदा एक गंभीर दावा करताना दिसत आहे. त्याने त्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्याने पुन्हा एकदा सलमान खानचं नाव घेतलं आहे. सलमान खानकडून (Salman Khan) आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केआऱकेने केला आहे.
एकापाठी एक काही ट्विट्स करून केआरकेने या गोष्टीचा दावा केला आहे. या ट्विट्सनुसार, केआरकेला एका व्यक्तीचा मेसेज आल आणि त्याने स्वत:ला केंद्रीय मंत्र्याचा पीए संजय असल्याचं सांगितलं. या व्यक्तीने त्याला फार मोठी माहिती दिल्याचं तो बोलत आहे. या व्यक्तीने पेनड्राइव्हमध्ये अनेक खळबळजनक रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला. पण या पेनड्राइव्हसाठी केआरकेला १० लाख रूपये द्यावे लागतील.
Dear @DelhiPolice@MumbaiPolice please note, First Someone did send me mail and claimed to be PA of a minister. He asked me to contact him for information. When I called him On given number, So he did contact me from other WhatsApp number. He claimed to have recording about me.
— KRK (@kamaalrkhan) March 24, 2022
या व्यक्तीने असाही दावा केला की, शाहरूख खानला त्याचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यापूर्वीच माहिती दिली गेली होती. केआरकेने या व्यक्तीचे दावे आणि त्याचं सत्य जाणून घेण्यासाठी चौकशीची मागणी केली आहे. या व्यक्तीने केआरकेला कथितपणे सांगितलं की, सलमान खानने त्याची सुपारी दिली आहे. ट्विटमध्ये केआरकेने लिहिलं आहे की, या व्यक्तीने सांगितलं की, सलमान खानने मुंबई आणि दिल्ली पोलिसांना ५० कोटी रूपयांत माझी सुपारी दिली आहे. यात अनेक मंत्र्यांचाही समावेश आहे. मी भारतात येणार तेव्हा मारला जाणार.
Dear @DelhiPolice@MumbaiPolice please note, First Someone did send me mail and claimed to be PA of a minister. He asked me to contact him for information. When I called him On given number, So he did contact me from other WhatsApp number. He claimed to have recording about me.
— KRK (@kamaalrkhan) March 24, 2022
केआरकेने दिल्ली आणि मुंबई पोलिसांना सांगितलं की, कुणीतरी आधी त्याला मेल केला आणि नंतर मंत्र्याचा पीएस असल्याचं सांगितलं. माहितीसाठी कॉन्टॅक्ट करण्यास सांगितलं. मी जेव्हा त्याने दिलेल्या नंबरवर फोन केला तर त्याने दुसऱ्या व्हॉट्सअॅप नंबरवरून मला कॉन्टॅक्ट केला. त्याने दावा केला की, त्याच्याकडे माझ्याबाबत काही रेकॉर्डिंग आहे.
आता केआरके आणि त्या पीएच्या बोलण्यात किती सत्य आहे माहीत नाही. पण पुन्हा एकदा सलमान खानचं नाव घेऊन केआरकेला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याची संधी मिळाली. तसाही सलमान आणि केआरकेचं पटत नाही हे सर्वांनाच माहीत आहे.