कंगनाने करण जोहरवर हल्ला करण्यास सांगितलं - KRK चा खुलासा; म्हणाला - पुरावेही आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 03:14 PM2021-10-02T15:14:15+5:302021-10-02T15:16:44+5:30
त्याने एका सोशल मीडिया पोस्टमधून दावा केला आहे की, कंगनाने त्याला करण जोहरवर काहीतरी वाईट बोलून हल्ला करण्यासाठी सांगितलं होतं.
कमाल राशिद खान ज्याला केआरके नावानेही ओळखलं जातं. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या बॉलिवूड स्टारच्या मागे लागलेला असतो. काही दिवसांपूर्वी तो सलमान खानबाबत खुलासे करत होता. आता त्याने कंगना राणावतबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या केआरकेच्या निशाण्यावर कंगना राणावत आहे. त्याने एका सोशल मीडिया पोस्टमधून दावा केला आहे की, कंगनाने त्याला करण जोहरवर काहीतरी वाईट बोलून हल्ला करण्यासाठी सांगितलं होतं.
स्वयंघोषित सिने समीक्षक केआरके आपल्या ट्विटर अकाउंटचा वापर बॉलिवूडमधील स्टार्सना शिव्या देण्यासाठी, त्यांना नावं ठेवण्यासाठी करतो.नव्या पोस्टमधून त्याने कंगनाला आपली 'दीदी' म्हणत ती कशी खोटारडी आहे हे सांगितलं. त्याने हेही सांगितलं की, कंगना तिच्या नव्या सिनेमासाठी म्हणजे 'थलायवी' साठी देशभक्तीचं कार्ड चालवत आहे.
आता कंगनाने खुलासा केला आहे की, कंगना राणावतने त्याला करण जोहरबाबत सार्वजनिकपणे बोलण्यासाठी सांगितलं होतं. त्याने असाही दावा केला की, आमचं बोलणं झालं याचा पुरावा म्हणून त्याच्याकडे एसएमएस आहेत. पण ते तो सार्वजनिक करू शकत नाही'.
केआरकेने लिहिलं की, 'आजपर्यंत कोणत्याही सिनेमावाल्याने कंगना राणावतला सोडून मला दुसऱ्या सिनेमावाल्याबाबत वाईट बोलण्यासाठी सांगितलं नाही. तिने मला करण जोहरबाबत खूप काही वाईट बोलण्यास सांगितलं. माझ्याकडे पुरावे म्हणून एसएमएस आहेत. पण मी ते चॅट कधीच सार्वजनिक करणार नाही. मी आजपर्यंत कधीही कुणासमोर कोणतंही चॅट आणलं नाही आणि भविष्यातही असं करणार नाही'.
Till date no filmwala has asked me to say bad about other filmwala except #KanganaRanaut who asked me to say many things bad about #KaranJohar. I m having her all SMS as proof but I will never public that chat. I have never revealed anyone chat till date n I won’t do it in future
— KRK (@kamaalrkhan) October 1, 2021
एका ट्विटमध्ये केआरके ने लिहिलं की, '“#Thalaivii च्या बेकार रिव्ह्यूनंतर कंगनार राणावत जनतेला ज्ञान पाजत फिरत आहे. ती म्हणाली की, आपण सर्वांनी देशभक्त बनावं आणि आत्मनिर्भर व्हावं. त्यासाठी इंग्रजी सिनेमे बघणं बंद करून भारतीय सिनेमे बघावे. Lol! दीदी आम्ही तुला कोट्याधीश बनवण्यासाठी तुझे बकवास सिनेमे बघणार नाही. जनता मूर्ख नाही'.