शाहरुख आणि काजोलची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार, करण जोहरची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:41 IST2023-10-12T16:35:57+5:302023-10-12T16:41:20+5:30
बॉलीवूडमधूनच एक बातमी समोर आली आहे की शाहरुख आणि काजोल लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Kuch Kuch Hota Hai to re-release in theatres on its 25th anniversary in theatres on 15th October, 2023
बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे शाहरुख खान आणि कोजोल. या दोघांनी एकत्र हीट सिनेमे दिले आहेत. आणि त्यांना एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. आता बॉलीवूडमधूनच एक बातमी समोर आली आहे की शाहरुख आणि काजोल लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
16 ऑक्टोबर 1998 रोजी रिलीज झालेल्या करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाचा 25 वर्षे पूर्ण होत आहे. या खास प्रसंगी, निर्मात्यांनी तो पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.धर्मा प्रॉडक्शनने 'कुछ कुछ होता है' पुन्हा रिलीज आणि स्पेशल स्क्रीनिंगची घोषणा केली. त्यामुळे 15 ऑक्टोबर 2023 रोजी शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली. तेव्हा काही मिनिटांतच सर्व तिकिटे विकली गेली. याचे आणखी एक कारण म्हणजे करण जोहरने या चित्रपटाच्या तिकिटाचे दर खूपच स्वस्त ठेवले होते. 25वा वर्धापन दिन असल्याने तिकिटांची किंमत २५ रुपये ठेवण्यात आली होती. हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2023 रोजी PVR आयकॉन वर्सोवा, मुंबई येथे संध्याकाळी 7:00 आणि 7:15 वाजता प्रदर्शित केला जाणार आहे.
करण जोहरने 'कुछ कुछ होता है'मधून दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले. हा त्याचा पहिला चित्रपट होता आणि सुपरहिट ठरला. लोकांमध्ये या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे.