Kumar Gaurav : डोक्यात हवा गेली अन् करिअर संपलं...! ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरवला आता ओळखणंही झालं कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 10:27 AM2022-07-11T10:27:10+5:302022-07-11T10:29:32+5:30

Kumar Gaurav Birthday : ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता कुमार गौरव एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. पण आता या चॉकलेट बॉयला बघाल तर ओळखणं कठीण होईल.

Kumar Gaurav Birthday Actor Who Rose To Stardom With Love Story Quit Film Industry | Kumar Gaurav : डोक्यात हवा गेली अन् करिअर संपलं...! ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरवला आता ओळखणंही झालं कठीण!!

Kumar Gaurav : डोक्यात हवा गेली अन् करिअर संपलं...! ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरवला आता ओळखणंही झालं कठीण!!

googlenewsNext

Kumar Gaurav Birthday : ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता कुमार गौरव (Kumar Gaurav ) एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. पण आता या चॉकलेट बॉयला बघाल तर ओळखणं कठीण होईल.  हा चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता कुमार गौरव. आज कुमार गौरव आठवण्याचं कारण म्हणजे, 11 जुलै हा त्याचा वाढदिवस.

 1981 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून कुमार गौरवने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कुमारचं नशीब इतकं चांगलं की, त्याचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला. तो एका रात्रीत स्टार झाला. पण यश सगळ्यांनाच पचवता येत नाही, असं म्हणतात ना?  तसंच काही कुमारसोबत घडलं.  एका रात्रीत मिळालेलं यश कुमारलाही पचवता आलं नाही.  डोक्यात हवा गेली आणि तो नकार देत सुटला. कुमारचे नखरे इतके की, त्या काळातील अनेक नव्या अ‍ॅक्ट्रेसेसबरोबर काम करायला त्याने नकार दिला. यातलीच एक म्हणजे मंदाकिनी. 

दिनेश बन्सल यांनी त्यांच्या ‘शिरीन फरहाद’ चित्रपटासाठी यास्मीन नावाच्या नव्या मुलीला साईन केलं होतं. या चित्रपटात त्यांना कुमार गौरव हवा होता. पण मी नव्या मुलीसोबत काम करणार नाही, असं सांगून त्याने यास्मीनसोबत काम करण्यास नकार दिला. याचा परिणाम म्हणजे, चित्रपट बंद झाला. बिचाºया यास्मीनला आल्या पावली इंडस्ट्रीतून परत जावं लागलं. अर्थात पुढे  चार वर्षांनंतर हीच यास्मिन मंदाकिनी बनून परतली.  यास्मीनने ‘राम तेरी गंगा मैली’साठी ऑडिशन दिलं आणि तिची निवड झाली.  चित्रपट सुपरहिट झाला आणि मंदाकिनी स्टार बनली.  या चार वर्षांत कुमार गौरव कुठे होता? तर तोपर्यंत कुमार गौरववर फ्लॉपचा शिक्का बसला होता. आता कुठलीही मोठी हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हती. अशात कुमार गौरवने एका निर्मात्याला मंदाकिनीचं नाव सुचवलं. होय, ज्या मंदाकिनीला कुमार गौरवने नकार दिला होता, तिचंच नाव कुमार गौरवने एका निर्मात्याला सुचवलं. पण कुमारने आधी आपल्याला नाकारलं होतं, हे मंदाकिनी कसं विसरणार होती? तिने वचपा काढलाच. आता तिने कुमारसोबत काम करण्यास नकार दिला.  


 
कुमार गौरव हा सुपरस्टार राजेंद्र कुयांचा मुलगा. अन्य वडिलांप्रमाणे राजेंद्र कुमार यांनीही मुलाचे करिअर वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत.   माधुरी दीक्षितला घेऊन ‘फूल’ हा  चित्रपट त्यांनी काढला. पण तोही सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर कुमार गौरवने  तेरी कसम, ऑल राऊंडर, जानम,  गूंज, सियासत अशा अनेक चित्रपटांत काम केलं. पण त्याला यश मिळालं नाही. 

फिल्म इंडस्ट्रीत जम बसणार नाही, हे तोपर्यंत कुमार गौरवला कळून चुकलं होतं. अखेर त्याने इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि स्वत:चा बिझनेस सुरू केला. सध्या तो मालदीवमध्ये  ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करतो. त्याचा कन्सट्रक्शनचाही बिझनेस आहे. 

1984 मध्ये कुमार गौरवने सुनील दत्त यांची मुलगी आणि संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिच्यासोबत लग्न केलं. दोघांनाही साची आणि सिया अशा दोन मुली आहेत.

Web Title: Kumar Gaurav Birthday Actor Who Rose To Stardom With Love Story Quit Film Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.