SEE PICS : ग्लॅमरस आहे कुमार सानूची लेक, हॉलिवूडमध्ये आहे मोठे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 12:12 IST2020-04-28T12:11:49+5:302020-04-28T12:12:05+5:30
होय, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कुमार सानूची मुलगीही गायिका बनली.

SEE PICS : ग्लॅमरस आहे कुमार सानूची लेक, हॉलिवूडमध्ये आहे मोठे नाव
आशिकी, साजन, दिवाना, बाजीगर, 1942: अ लव्ह स्टोरी यांसारख्या अनेक चित्रपटांमधील कुमार सानूच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावले. त्याची सगळीच गाणी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. पण आज आम्ही कुमार सानूबद्दल नाही तर त्याच्या मुलीबद्दल सांगणार आहोत. होय, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कुमार सानूची मुलगीही गायिका बनली. आज बॉलिवूडची उत्तम गायिका म्हणून ती ओळखली जाते. तिचे नाव शॅनन.
शॅनन के नावाने ओळखली जाणारी कुमार सानूच्या मुलीने आत्तापर्यंत अनेक गायकांसोबत गाणी गायली आहेत.
कुमार सानूप्रमाणे शॅननही स्टाईलिश आहे. 2018 मध्ये तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
अमेरिकेत ‘अ लॉन्ग टाईम’ हे गाणे तिने गायले होते. हॉलिवूडचा पॉप स्टार जस्टीन बीबरचा सहकारी Poo Bear याने हे गाणे प्रोड्यूस केले होते.
2001 साली कुमार सानूने शॅननला दत्तक घेतले होते. आज हॉलिवूडमध्ये शॅननमुळेच लोक कुमार सानूला ओळखतात. एका मुलाखतीत तो याबद्दल बोलला होता.
‘शॅनन माझी खरी मुलगी आहे वा नाही, याने मला काहीही फरक पडत नाही. शॅननचा मला अभिमान आहे. आज हॉलिवूडचे लोक केवळ तिच्यामुळे मला ओळखतात. कुठल्याही बापासाठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असेल,’ असे कुमार सानू म्हणाला होता.
कुमार सानू व शॅनन या बापलेकीने ‘इट्स मॅजिकल’ हे गाणे एकत्र गायले होते. यातील हिंदी गाण्याला कुमार सानूने आवाज दिला होता. तर इंग्रजीतील गाणे शॅननने गायले होते. पण यापुढच्या काळात ही बापलेकीची जोडी एकत्र गाण्याची शक्यता कमी आहे.
होय, माझ्या मुलीसोबत मला रोमॅन्टिक गाणे गाण्याची इच्छा नाही, असे अलीकडे कुमार सानूने एका मुलाखतीत म्हटले आहे.