मला आजपर्यंत एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही: कुमार सानूची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 01:04 PM2021-02-05T13:04:30+5:302021-02-05T13:15:32+5:30
रसिकांचे प्रेमच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.आणि कोणतीही अपेक्षा नसतानाही मला पद्मश्री मिळाला.अजिबात वाटले नव्हते. आयुष्यात कधी पद्मश्री मिळेल याचा विचारही केला नव्हता.
'गेली कित्येक वर्ष मी आज इंडस्ट्रीत काम करतोय, ३० ते ३५ वर्षाच्या करिअरमध्ये मी १४ हजांराहून अधिक गाणी गायली आहेत. ते सगळे सुपरहिटही ठरले आहे. पण आजपर्यंत एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळवू शकलो नाही,' कदाचित राष्ट्रीय पुरस्कारासाठी मी लायक नाही. अशी खंत बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी व्यक्त केली आहे.
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली ही खंत बोलून दाखवली आहे. १९९० ते १९९६ या काळात आम्ही जे गाणी इंडस्ट्रीला दिले. ते सगळे गाणी सुपरहिट ठरली होती. या गाण्यांमुळे प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता. इतके चांगले काम करुनही माझी या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली नाही. ज्यावेळी पुरस्कार द्यायचा होता तेव्हा तर दिला नाही ते आता काय माझी दखल घेतील. प्रत्येक वर्षी मी राष्ट्रीय पुरस्कारासाठी वाट बघायचो. पण प्रत्येकवर्षी पदरी निराशाच पडली. ''घुँघट के आरसे'' हे गाणे इतके फेमस झाले होते की, आजही या गाण्याची जादू कायम आहे.
याच गाण्यामुळे अलका याग्नीकला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मला नाही मिळाला. पुरस्कार मिळायला हवे असे मला अजिबात वाटत नाही. रसिकांच्या प्रेमापुढे हे पुरस्काराचे काहीच मोल नाही. रसिकांचे प्रेमच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतीही अपेक्षा नसतानाही मला 'पद्मश्री' मिळाला. अजिबात वाटले नव्हते. आयुष्यात कधी पद्मश्री मिळेल याचा विचारही केला नव्हता.
'पद्मश्री' पुरस्कार मिळाला सौभाग्य माझे. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होते, तेव्हा मात्र वाईट वाटते की, नवोदित कलाकारांनाही हा पुरस्कार दिला जातो. नक्कीच यांच्यापेक्षा माझे योगदान या क्षेत्रात जास्त आहे. तरीही याची कधीच दखल घेतली गेली नाही. याचाच अर्थ राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मोठा झोल होत असावा, वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण तिथेही होतच असणार.
जान कुमार सानूच्या मराठी विरोधी वक्तव्यावर गायक कुमार सानू यांनी मागितली माफी, म्हणाले -
जान कुमार सानूच्या नुकत्याच झालेल्या वादाववर कुमार सानू म्हणाले की, 'जानने नकळत मराठी भाषेबाबत जे बोलले ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, बंगाली जर माझी देवकी आई आहे जिने मला जन्म दिला तर मुंबई माझी यशोदा आई आहे. जिने मला काम दिलं, अन्न दिल आणि मान-सन्मान दिला. माझी आई मुंबा देवीवर श्रद्धा आहे. कोणत्याही कलाकाराने मुंबईबाबत वाईट बोलू नये. मुंबईने अनेकांना जीवन दिलं आहे'.