कुणाल कोहली घेऊन येतोय 'या' पौराणिक कथेवर आधारित सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 12:58 PM2018-07-24T12:58:14+5:302018-07-24T13:01:42+5:30
दिग्दर्शक कुणाल कोहली पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कुणालने याआधी हम-तुम आणि फना सारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. आता कुणाल कपूर आपला नवा ड्रीम प्रोजेक्ट रामायण घेऊन येतोय.
दिग्दर्शक कुणाल कोहली पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कुणालने याआधी हम-तुम आणि फना सारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. आता कुणाल कपूर आपला नवा ड्रीम प्रोजेक्ट रामायण घेऊन येतोय.
कोहलीने सांगितले की, मी रामायणाला नव्या पद्धतीने सादर करणार आहे. यामागचे खास कारण आहे की, रामायणचे चरित्र आणि त्यातत दिलेला संदेशाचा सध्या खूप गरज आहे. आपण अशा काळात जगत आहोत की सध्या रामायणात दिलेल्या मुल्यांची सगळ्यात जास्त गरज. त्यांने पुढे सांगितले आहे की तो या सिनेमात मोठी नाव घेणार नाहीय. सध्या तो यासाठी स्टार कास्टच्या शोधात आहे. प्रसिद्ध चेहऱ्याना न घेण्यामागचे कारण की हे चेहरे पौराणिक भूमिकेंशी पटकन कनेक्ट होऊ शकत नाहीत.
कोहली 'रामायण'मधील काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन सिनेमा तयार करणार आहे. तो म्हणाला, ''संपूर्ण रामायणावर सिनेमा तयार करणे शक्य नाही आहे.'' कोहली ज्या गोष्टींवर शूट करणार आहे त्यावर लक्ष देतोय. कुणाल पुढे म्हणाला की, सध्या कास्टिंगचे काम सुरु आहे. आम्हाला हा सिनेमा पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण करून रिलीज करायचा आहे.
कुणाल कोहलीने आपल्या करिअरची सुरुवात यशराज बॅनरच्या 'मुझसे दोस्ती करोगे' केली होती. यात ह्रतिक रोशन, राणी मुखर्जी आणि करिना कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'रामायण' हा कुणालचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. सध्या कुणालच्या 'रामायणा' बरोबरच आमिर खान 'महाभारत' सिनेमाची ही चर्चा आहे. आमिर खान हा सिनेमा सिरीजमध्ये बनवणार आहे. सध्या तो यावर काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता कुणाल कोहलीचा 'रामायण' की आमिर खानचा 'महाभारत' कोणता सिनेमा आधी प्रेक्षकांच्या भेटीला येतो ते.