‘कुंग फू योगा’ भारतात आपटला पण चीनमध्ये तरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 08:40 AM2017-02-08T08:40:05+5:302017-02-08T14:10:05+5:30

मार्शल आर्ट कुंग फू एक्सपर्ट आणि इंटरनॅशनल सुपरस्टार जॅकी चॅन ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येऊन गेला. ...

'Kung Fu Yoga' catches in India, but in China! | ‘कुंग फू योगा’ भारतात आपटला पण चीनमध्ये तरला!

‘कुंग फू योगा’ भारतात आपटला पण चीनमध्ये तरला!

googlenewsNext
र्शल आर्ट कुंग फू एक्सपर्ट आणि इंटरनॅशनल सुपरस्टार जॅकी चॅन ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येऊन गेला. सोनू सूद, दिशा पाटणी यांनी वेगवेगळ्या शोमध्ये जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन केले. पण इतके करूनही या चित्रपटाकडे भारतीय प्रेक्षकांनी पाठ फिरवली ती फिरवलीच. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट दणकून आपटला. पण चीनी बॉक्सआॅफिसचे म्हणाल तर या चित्रपटाने एकदम धम्माल केली.

 भारत आणि चीन यांच्यात झालेल्या एका कराराअंतर्गत या इंडो-तिबेटीयन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. साहजिक यात भारत आणि चीन या दोन्ही देशांचे स्टार होते. चीनचा अ‍ॅक्शन स्टार जॅकी चॅन हा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. तर सोनू सूद हा भारताचा लाडका अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत. भारतीय अभिनेत्री अमायरा दस्तूर आणि दिशा पाटणी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चीनी आणि भारतीय कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट भारतात चांगली गर्दी खेचेल, अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. अर्थात चीनी बॉक्सआॅफिसवर मात्र ‘कुंग फू योगा’ तरला. मीडिया वृत्तानुसार, ‘कुंग फू योगा’ चीनी बॉक्सआॅफिसवर गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे. ५ फेबु्रवारीला संपलेल्या आठवड्यात या चित्रपटाने चीनी बॉक्सआॅफिसवर सुमारे ९४३ कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. याऊलट चीनी होम प्रॉडक्शनचा ‘जर्नी टू द वेस्ट- द डिमंस स्ट्राईक बॅक’ हा चित्रपट दुसºया क्रमांकावर राहिला. या चित्रपटाने चीनी बॉक्सआॅफिसवर सुमारे ८०५ कोटींचा गल्ला जमवला.
एकंदर काय, जॅकी चॅनने पुन्हा एकदा चीनचा सुपरस्टार तोच, हेच जणू सिद्ध केले.

ALSO READ : watch : जॅकी चॅन ‘चुलबुल पांडे’साठी घेऊन येतोय ‘पॉपरपॅक्ड सरप्राईज’!!
DIE HARD FAN : ... अन् शिल्पा शेट्टी पडली जॅकी चॅनच्या पाया !
 
 

Web Title: 'Kung Fu Yoga' catches in India, but in China!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.